ताज्या घडामोडी

डॉ. ऋतुजा शिवदास मुंडे हिचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उज्ज्वल यश; पटकावले ‘बलभीम करंडक’ द्वितीय पारितोषिक.

पाठलाग न्युज.

डॉ. ऋतुजा शिवदास मुंडे हिचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उज्ज्वल यश; पटकावले ‘बलभीम करंडक’ द्वितीय पारितोषिक.

​बीड /विशेष प्रतिनिधी: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीड येथील पदवी,पदव्युत्तर मराठी विभाग आणि संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बलभीम करंडक’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२६ (वर्ष ४ थे) उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ.ऋतुजा शिवदास मुंडे हिने “भेसळीच्या विषा, तुकारामाच्या देशा” या विषयावर विचार मांडत आपल्या उत्कृष्ट वक्तृत्वाची छाप पाडत द्वितीय पारितोषिक पटकावून यश मिळवले आहे.ही स्पर्धा ९ ऑक्टोबर २०२६ रोजी बीड येथील बलभीम महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. स्पर्धेमध्ये राज्यातील विविध महाविद्यालयांतील ४० स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. सामाजिक, वैचारिक व समकालीन विषयांवर स्पर्धकांनी आपले परखड विचार मांडले. ​डॉ. ऋतुजा मुंडे यांनी आपल्या प्रभावी आणि अभ्यासपूर्ण भाषणाने परीक्षक व उपस्थितांची मने जिंकली. पारितोषिक वितरण समारंभात डॉ.ऋतुजाला ₹७,०००/- रोख रक्कम, मानाचे सन्मानचिन्ह ( बलभीम करंडक) व सन्मानपत्र देऊन बीड येथील पोलीस उपाधीक्षक नवले साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.​कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. मनोहर सिरसाट, उपप्राचार्य प्रो. डॉ. बाबासाहेब कोकाटे, प्रा. डॉ. अनिल चिंधे, प्रो. डॉ. संतोष उंदरे तसेच समन्वयक प्रा. डॉ. संदीप बनसोडे, डॉ. संदीप परदेशी, डॉ. सुनिता बोराडे, डॉ. राजीव काळे, प्रा. भाग्योदय घाटे व डॉ. रेखा ढेरे यांनी विशेष परिश्रम घेतले. ​डॉ. ऋतुजा मुंडे यांच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये