ताज्या घडामोडी

८ हजारांची लाच घेताना उमरी सज्जाचा तलाठी जेरबंद. सातबारा नोंद व फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; लाच लुचप विभागाच्या पोलिसांच्या सापळ्यात केज मधील तलाठी परमेश्वर फलके रंगेहात जेरबंद.

८ हजारांची लाच घेताना उमरी सज्जाचा तलाठी जेरबंद.

सातबारा नोंद व फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाच्या पोलिसांच्या सापळ्यात केज मधील तलाठी परमेश्वर फलके रंगेहात जेरबंद.

केज, दि. ८ : उमरी सज्जाचे तलाठी परमेश्वर फलके याला ₹८ हजारांची लाच स्वीकारताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची घटना गुरुवारी (दि. ८) दुपारी केज येथे घडली. या कारवाईमुळे महसूल विभागात पुन्हा आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उमरी येथील एका शेतकऱ्याच्या सहमतीच्या वाटणीपत्राची सातबारा उताऱ्यावर नोंद करून ती मंजूर करणे तसेच संबंधित फेरफार मंजूर करण्यासाठी तलाठी परमेश्वर फलके याने संबंधित शेतकऱ्याकडे ₹८ हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतकऱ्याने याबाबत बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (ACB) संपर्क साधला. त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून ACBने सापळा रचला. गुरुवारी दुपारी सुमारे २ वाजता केज तहसील कार्यालयाच्या पाठीमागील सरकारी गोदाम परिसरातील भागात असलेल्या तलाठी सज्जाच्या कार्यालयात संबंधित शेतकऱ्याकडून ₹८ हजारांची लाच स्वीकारत असताना तलाठी परमेश्वर फलके याला ACBच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. या कारवाईनंतर संबंधित तलाठ्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ACBकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपांची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणार आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये