बोगस विद्यार्थी दाखवून शासनाची फसवणूक; गेवराईतील नूतन विद्यालय ढोकगाव या शाळेविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार.
बीड / गेवराई: बनावट व कागदपत्रांच्या आधारे बोगस विद्यार्थी प्रवेश दाखवून शासनाची आणि समाजाची दिशाभूल केल्याचा गंभीर प्रकार गेवराई तालुक्यातील ढोकगाव येथील एका शाळेत समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांविरुद्ध सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि चकलांबा पोलिस स्टेशन यांच्याकडे तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. याबाबत निवेदनात नमूद केलेली सविस्तर माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील ढोकगाव येथील नूतन विद्यालय,ढोकगाव तालुका गेवराई या शाळेचे संस्था सचिव ठाकूरराव माधवराव नावंदे यांनी शिक्षण खात्यातील अधिकारी यांच्याशी संगनमत करून शाळेत मुख्याध्यापक, लिपिक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने बोगस विद्यार्थी दाखवून गैरप्रकार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शाळा सोडून गेलेले, नापास झालेले, लग्नानंतर शाळा सोडून गेलेल्या मुलींचे पुनर्प्रवेश दाखवून तसेच इतर शाळांमधून बोगस टी.सी. स्टुडन्ट पोर्टलवर दाखवून बनावट नोंदी करण्यात आल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. १९ बोगस विद्यार्थ्यांची यादी व वर्गांची माहिती शाळेमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी दरम्यान जवळपास १९ बोगस विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखवण्यात आले आहेत. या अर्जात नमूद केलेल्या बोगस विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:–सोनाली सुकल्याण बहीर – १० वी जहारा अमोला विठ्ठलकर – १० वी प्रियंका प्रफुल्ल सोनवणे – १० वी,कार्तिक रंगनाथ जाधव – १० वी क्षितिज कुंदलवार – १० वी,रोहित कुंदलवार – १० वी रुक्मिणी सुनील लोंढे – १० वी,राजेंद्र गायकवाड – १० वी दत्ता पवार – १० वी विशाल गायकवाड – १० वी,निघांती महागुडे – १० वी,जालिंदर बारडे – १० वी जालिंदर ढोरे – १० वी मधुकर उघडे – १० वी,मनोहर शेडगे – १० वी,निखिल संजीव गायकवाड – १० वी,अमर लक्ष्मण रूपनर – १० वी,विठ्ठल बिसू थोरिटे – १० वी,राम भरत लोंढे – १० वी,शाळेमध्ये अशा प्रकारे ५ वी ते ९ वी व १० वीच्या वर्गांमध्ये बोगस विद्यार्थी दाखवून पटसंख्या फुगवण्यात आली असून, त्या आधारे शाळेवर ज्यादा शिक्षकांची नियुक्ती दाखवण्यात आली आहे. विद्यार्थी पोर्टलवर ऑनलाइन सिस्टीमद्वारे बनावट नोंदी करून संचमान्यतेसाठी ही पटसंख्या ग्राह्य धरली जावी आणि याद्वारे बोगस शिक्षक पदे मंजूर करून घेतली जावीत, असा कट रचण्यात आल्याचा आरोप तक्रारधारकाने आपल्या निवेदनाद्वारे केला आहे. तक्रारदाराने या गैरप्रकाराबाबत आपल्या निवेदनातून याप्रकरणी खालील मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत: १. शाळेतील बोगस विद्यार्थ्यांची नावे त्वरित कमी करण्यात यावीत. २. या गैरप्रकारात सहभागी असणारे संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ३. गैरप्रकार करणाऱ्या या शाळेची मान्यता काढून घेण्यात यावी.सदरील तक्रार ही श्री ब्रजमोहन धिरजप्रसाद (पेठ गल्ली, परळी वैजनाथ) यांच्याकडून शिक्षण विभाग व जि. प. बीड प्रशासनाकडे तसेच सदरची तक्रार ब्रिज मोहन मिश्रा यांनी चकलांबा पोलीस स्टेशन चकलांबा तालुका गेवराई यांच्याकडेही दाखल करण्यात आली असून, संबंधित संस्थाचालकावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यावर प्रशासन आणि पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.