ताज्या घडामोडी

स्व. प्राचार्य बी. के. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाला सांघिक प्रथम पारितोषिक तर, वैयक्तिक गटातून ऋतुजा शिवदास मुंडे सर्वप्रथम.

पाठलाग न्युज.

स्व. प्राचार्य बी. के. सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाला सांघिक प्रथम पारितोषिक तर, वैयक्तिक गटातून ऋतुजा शिवदास मुंडे सर्वप्रथम.

अंबाजोगाई : योगेश्वरी शिक्षण संस्थेचे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई येथे आयोजित स्व. प्राचार्य भ. कि. सबनीस स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२६ २७ उत्साहात पार पडली. स्पर्धेच्या सांघिक गटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, मुंबई विद्यापीठाने प्रथम, बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय,अंबाजोगाईने द्वितीय, तर,लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, परळी वैजनाथने तृतीय, तर दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूरने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले असून,

वैयक्तिक गटात कु. ऋतुजा शिवदास मुंडे ( डॉ.दीपक पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय, कोल्हापूर) हिने प्रथम, कार्तिक ज्ञानेश्वर दराडे (पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर) याने द्वितीय, तर,अभय कृष्णकांत आळशी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, मुंबई विद्यापीठ) याने तृतीय, आणि गायत्री ज्ञानदेव कुटे (बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय, अंबाजोगाई) हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. समारोप कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वाजता महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. पी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते, माजी विद्यार्थी भारत गोचडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर अध्यक्षस्थानी होते तर,उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांनी व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासा सोबत क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रमांतील सहभागाचे महत्त्व विशद केले. स्व. प्राचार्य सबनीस यांच्या पारदर्शक प्रशासनाची, विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनाची, सामाजिक संवेदनशीलतेची आणि विविध सामाजिक चळवळींतील सक्रिय सहभागाची आठवणही करून देण्यात आली. अंबाजोगाईत स्पर्धेचा उत्साहात समारोप…! अध्यक्ष बर्दापूरकर यांनी सबनीस सरांच्या आठवणी व किस्से सांगून स्पर्धेमागील भूमिका स्पष्ट केली. उद्घाटनाचे प्रास्ताविक संयोजक प्रा. रमेश सोनवळकर यांनी केले. प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांनी स्वागत केले, डॉ. शैलजा बरूरे यांनी आभार मानले, तर डॉ. संपदा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे अभिजित जोंधळे यांनी वक्तृत्व स्पर्धेतील प्रभावी सादरीकरण, संदर्भाचा वापर, अभ्यास, वाचन, मनन आणि बहुश्रुत श्रवण यांचे महत्त्व सांगितले. संस्थेचे सल्लागार प्रा. एन. के. गोळेगावकर यांनी सबनीस सरांच्या प्रेरक आठवणी सांगितल्या, तर ज्येष्ठ सल्लागार प्रा. माणिकराव लोमटे यांनी अध्यक्षीय समारोप केला. योगेश्वरी शिक्षक व कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष बी. के. मसने यांची उपस्थिती होती. प्रा. रमेश सोनवळकर यांनी आभार मानले, तर प्रा. सविता बुरांडे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. मारोती कसाब, प्रा. डॉ. मकरंद जोगदंड, प्रा. रामेश्वर माले आणि प्रा. डॉ. आशालता होळकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य डॉ. रमेश सोनटक्के, जितेंद्र देशपांडे, डॉ. शैलजा बरूरे, श्रीहरी रामदासी, प्रा. श्रीराम शेप, डॉ. बिजयसिंग भाबरदोडे, डॉ. प्रदीप चौधरी, डॉ. भाऊराव मुंडे, प्रा. अभिजित देशपांडे, प्रा. अर्चना जोशी, प्रा. दीपक पालमकर, प्रा. डॉ. होदलूरकर, प्रा. डॉ. बालाजी रुद्देवाड, रवी देशमुख, अभय शेटे, शमशू सय्यद, बाबर सय्यद, भारत वेडे आणि बाळू वैद्य यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. दिवसभरात गणेश लोमटे, गिरीश पुजारी, महेश लोमटे, प्रा. डॉ. साहेबराव गाठाळ, पी. एन. कुलकर्णी यांच्यासह माजी विद्यार्थी, निमंत्रित प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये