ताज्या घडामोडी

स्व. प्राचार्य भ.कि. सबनीस स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न;डॉ.ऋतुजा शिवदास मुंडे यांनी पटकावले वैयक्तिक प्रथम पारितोषिक!

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

स्व. प्राचार्य भ.कि. सबनीस स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न;डॉ.ऋतुजा शिवदास मुंडे यांनी पटकावले वैयक्तिक प्रथम पारितोषिक!

​अंबाजोगाई, दि. १७ ऑक्टोबर (प्रतिनिधी): योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई (जि. बीड) येथे राज्यशास्त्र विभाग आणि स्व. प्राचार्य भ.कि. सबनीस स्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय कोल्हापूर च्या डॉ. ऋतुजा शिवदास मुंडे यांनी घवघवीत यश संपादन करत वैयक्तिक प्रथम पारितोषिक पटकावले आहे.आज शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्था परिसरातील अप्पाजी बाबाजी साहु नागानूटकर सभागृहात या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटनाचा व सविस्तर कार्यक्रम पार पडला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील वक्तृत्वकलेचा विकास व्हावा आणि वैचारिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने गेल्या २१ वर्षांपासून या नामांकित राज्यस्तरीय स्पर्धेचे सातत्याने आयोजन केले जाते. या स्पर्धेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि लोकशाहीचे भविष्य’, ‘विकास प्रकल्प विरुद्ध पर्यावरण: प्राधान्य कोणाला?’, ‘फेक न्यूज आणि भारतीय लोकशाही,’विकसित भारत २०४७: युवकांकडून अपेक्षा आणि आव्हाने’, ‘रोजगार, शिक्षण आणि युवकांचे राजकारण’ तसेच ‘आजच्या भारतात लोकशाही संवादाची आवश्यकता’ यांसारख्या समकालीन व ज्वलंत विषयांचा समावेश होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गुणवान व वक्तृत्वसंपन्न स्पर्धकांमधून डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक महाविद्यालया च्या डॉ. ऋतुजा शिवदास मुंडे यांनी ” विकसित भारत -2047: युवकांकडून अपेक्षा आणि आव्हान” या विषयावर प्रकाश झोत टाकत  आपल्या उत्कृष्ट वक्तृत्वशैलीच्या जोरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (रुपये ५,००० व मानचिन्ह आणि आणि प्रमाणपत्र असे आकर्षक पारितोषिक) आपल्या नावावर केले. ​समारंभ प्रसंगी विविध, मान्यवरांची व प्राध्यापकांची विशेष उपस्थिती लाभली होती.

यशस्वी स्पर्धकांचे महाविद्यालयीन परिवार, तसेच सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या रुकीला शिवदास मुंडे ने प्रथम पारितोषिक प्राप्त केल्याची माहिती मिळताच महाविद्यालयाच्या प्राध्यापक वर्ग आणि महाविद्यालयाच्या पदाधिकारी व संचालकांनी ऋतुजा मुंडे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये