‘हॉटेल बसंत विहार’चे संस्थापक नारायण मेहता यांचे निधन.
केज,/ प्रतिनिधी : केज शहरातील प्रसिद्ध ‘हॉटेल बसंत विहार’चे संस्थापक नारायण मेहता (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने केजमधील व्यापारी वर्तुळात शोककळा पसरली आहे. मूळचे राजस्थानचे असलेले मेहता १९५० च्या दशकात केजमध्ये आले. सुरुवातीला कावडीने पाणी वाहून उदरनिर्वाह करणाऱ्या मेहता यांनी अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर १९६२ मध्ये ‘हॉटेल बसंत विहार’ सुरू केले. आज चौथ्या पिढीपर्यंत पोहोचलेला हा व्यवसाय त्यांच्या संघर्षमय प्रवासाची साक्ष देतो. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी ४ वाजता अदकालीया, राजस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पाठलाग न्यूज परिवाराकडून स्व. नारायण मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.