ताज्या घडामोडी
बोगस विद्यार्थ्यांचा खेळ खल्लास! कोळगावच्या नूतन कोळेश्वर विद्यालयात संच मान्यतेसाठी मोठा सावळागोंधळ उघड; तक्रारीतील विद्यार्थ्यांची नावे चौकशीत उघड!
पाठलाग न्यूज / विशेष प्रतिनिधी :

बोगस विद्यार्थ्यांचा खेळ खल्लास! कोळगावच्या नूतन कोळेश्वर विद्यालयात संच मान्यतेसाठी मोठा सावळागोंधळ उघड; तक्रारीतील विद्यार्थ्यांची नावे चौकशीत उघड!
बीड: बीड जिल्ह्यातील गेराई तालुक्यातील नूतन कोळेश्वर विद्यालय, कोळगाव शाळेच्या बोगस प्रकाराबाबत ब्रिज मोहन मिश्रा व अन्य तक्रारधारकांनी विशेष चौकशी पथकाकडे(SIT) केलेल्या तक्रारीची चौकशी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. शाळेत प्रत्यक्षात एकही दिवस न येणाऱ्या आणि बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर संच मान्यता मिळवून बोगस शिक्षकांची भरती केल्याचा मोठा प्रकार चौकशी समितीच्या वस्तूनिष्ठ पाहणीत उघडकीस आला आहे. या खळबळजनक प्रकारामुळे बीडच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, बीडचा शिक्षण विभाग भ्रष्टाचार व काळ्याबाजाराच्या किती रसातळाला पोहोचला आहे, हे चौकशी अहवालातील धक्कादायक बाबीवरून स्पष्ट झाले आहे.चौकशी समितीची संयुक्त भेट: गटशिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार २१ ऑक्टोबर २०२६ रोजी चार केंद्रप्रमुखांच्या चौकशी समितीने शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली असता प्रस्तुत शाळेत अनेक विद्यार्थी विनापरवानगी गैरहजर असल्याचे उघड झाले आहे,: तपासणी दरम्यान नववी ते दहावीच्या वर्गात अनेक विद्यार्थी प्रवेश घेऊनही शाळेत पूर्णपणे गैरहजर असल्याचे आणि काही जणांनी टीसी घेऊनही त्यांचे नाव पटलावर दाखवल्याचे निष्पन्न झाले.चुकीचे रेकॉर्ड फॉरवर्ड केल्याची कबुली: मार्च २०२६ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या आणि इतर शाळांमधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या शाळेने चालू वर्षाच्या संच मान्यतेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन रेकॉर्डमध्ये बेकायदेशीरपणे पुढे पाठवले असल्याचे स्पष्ट झाले. चुकीने पाठवल्याची लंगडी करवाही: मुख्याध्यापक व शिक्षकांनी सदर विद्यार्थी “चुकीने संच मान्यतेसाठी फॉरवर्ड झाले आहेत,” अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र चौकशीत हा मोठा घोळ असल्याचे उघड झाले. तक्रारीत नमूद केलेल्या आणि चौकशीत उघड झालेल्या संशयित / बोगस विद्यार्थ्यांची यादी:- चौकशी दरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या नावावर घोळ समोर आला, त्यामध्ये प्रामुख्याने खालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे: दत्ता दशरथ पवार (वर्ग १० वी – भारतरत्न राजीव गांधी विद्यालय बीड, प्रवेशापासून सतत गैरहजर) कार्तिक लक्ष्मण गायकवाड (वर्ग १० वी),कार्तिक रघुनाथ जाधव (वर्ग १० वी),रितेश राजेंद्र कदलगगावकर (वर्ग १० वी) रोहित राजेंद्र कदलगगावकर (वर्ग १० वी) रवीना सुनील लोंढे (वर्ग १० वी) प्रियंका प्रकाश सोनवणे (वर्ग १० वी – नूतन कळसेश्वर विद्यामंदिर कळसंबर) अक्षरा अमोल खिडकर (वर्ग १० वी) अंजली विशाल गायकवाड (वर्ग ५ वी – मार्च २०२६ ची परीक्षा दिली) अश्विनी निवृत्ती महारुडे (वर्ग ५ वी – सतत अनुत्सुक नाव कमी १७-११-२५) कोमल जालिंदर बर्डे व वर्षा जालिंदर बर्डे (वर्ग ५ वी) निखिल सर्जेराव गायकवाड (वर्ग ५ वी – मार्च २०२६ SSC परीक्षा दिली) शिवम भरत लोंढे, सोनाली मुक्तीराम बहिर, दीक्षा मनोहर शेंडगे, राधिका पिटू बोराडे, दीक्षा मधुकर उघडे (मार्च २०२६ परीक्षा दिली नाही), तसेच ओमकार लक्ष्मण रुपनर यांसारख्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय वर्ग ९ वी मधीलही अनेक विद्यार्थ्यांची नावे (उदा. अक्षय संतोष कदम, दीपक प्रकाश अदममाने, शनेश्वरी प्रदीप कशदीय, गोविंद शिवाजी कुऱ्हाडे, कृष्णा पांडुरंग पदमपल्ले, कृष्णा सखाराम कुऱ्हाडे, महेश प्रकाश चावरे, निखिल गणेश खंडागळे, निकीता धनराज चके, सागर विलास इटकर, युवराज त्र्यंबक कुऱ्हाडे, पुनम मारोती राठोड, रूपाली अंकुश थोरात, सैफान गफर शेख, श्रावणी परमेश्वर गायकवाड, रुवांगी शंभू वावरे, सीमा भीमा मदारकुंडे इ.) ऑनलाईन-ऑफलाईन रेकॉर्डमध्ये विसंगत आढळली आहेत. कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी शालेय स्तरावर बोगस पटसंख्या दाखवून शासन फसवणुकीचा हा प्रकार समोर आल्याने पालकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि बोगस विद्यार्थ्यांच्या आधारे शासकीय लाभाचा अपहार करणाऱ्या अशा शाळांवर आणि संबंधितांवर शिक्षण विभागाने एसआयटीच्या माध्यमातून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता ‘पाठलाग न्यूज’च्या माध्यमातून केली जात आहे.




