केज/प्रतिनिधी: केज शहरालगत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी यांची १७ पदे मंजूर असताना रुग्णालयात सेवेसाठी केवळ तीन डॉक्टर उपलब्ध असून, यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे .संतप्त झालेले रुग्ण विना उपचार घेता परत जात आहेत. औषध उपचार अभावी रुग्णांना मरणकळा सहन कराव्या लागत आहेत कोणत्याच विभागाचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने केवळ चार गोळ्या घ्या आणि घरी जा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकूण परिस्थितीमुळे रुग्णांनी संताप व्यक्त केला आहे जिल्हा शल्य चिकित्सक याकडे का दुर्लक्ष करत आहेत हाच सवाल उपस्थित होत आहे. रुग्ने सेवेसाठी असणाऱ्या डॉक्टरांपैकी तीन वैद्यकीय अधिकारी निलंबित झालेले आहेत, या बदल्यात कोणतेही डॉक्टर देण्यात आलेले नाहीत निलंबित वैद्यकीय अधिकारी तथा जनरल सर्जन डॉ दत्तात्रेय केंद्रे, भुलतज्ञ डॉ प्रणिता पाटील,स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ स्वाती साखरे,हे निलंबित आहेत. रुग्णालयातून डॉ सचिन रेडिओलॉजिस्ट, डॉ सोनाली ठोकरे,यांची बदली इतरत्र करण्यात आली. त्यांच्या जागी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. वैद्यकीय अधिकारी अस्थिरोग तज्ञ डॉ कृष्णा म्हात्रे यांना एक महिन्यासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. डॉ सुशील पवार यांना जम्मू काश्मीर येथे रुग्णसेवेसाठी पाठवण्यात आले आहे. स्त्रीरोग तज्ञ डॉ केशव इंगोले यांना धारूर येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदभार देण्यात आलेला आहे डॉ आयेशा अन्सारी, नेत्ररोग तज्ञ डॉ स्नेहल बालरोग तज्ञ डॉ निवृत्ती मुंडे,भुलरोग तज्ञ डॉ डी एस मुंडे हे वैद्यकीय कारण देवून रजेवर गेलेले आहेत. रुग्णालयात उपलब्ध वैद्यकीय अधिकारी डॉ मुहम्मद हुसेन,डॉ समाधान घुगे,डॉ बी बी सावंत व राष्ट्रीय आरोग्य राष्ट्रीय आरोग्य अभियानचे कंत्राटी डॉ फिजा,डॉ स्वप्नील घोलप,डॉ चाळक,डॉ जयश्री टेकाळे, डॉ अजय पाटील, एकूण तीन वैद्यकीय अधिकारी रुग्ण सेवा देत आहेत. अस्थिरोग तज्ञ डॉ गित्ते हे आठवड्यात एक दिवस सेवा देतात,आणि रुग्ण मात्र रोज वाट पाहत बसतात. —- उपजिल्हा रुग्णालयात कही निवासी वैद्यकीय अधिकारी राहत नाही केज उप जिल्हा रुग्णालया त वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च निवासस्थान उभी करण्यात आली. डक्टरची पदे ही निवासी आहेत मात्र एकही डॉक्टर निवासस्थानी राहत नाहीत. याकडे जिल्हा शैल्य चिकित्सकाने लक्ष घालावे अशी नागरिकांची मागणी आहे. बीड जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. उपजल्हा रुग्णालयाच्या या परिस्थितीबद्दल आमदार नमिता मुंदडा यांनी लक्ष घालून रुग्णसेवा सुरळीत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.