गंगामाऊली शुगरचा पेरणीसाठी १२० रु.प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हाच आमचा नफा हे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांनी सिद्ध केले.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हाच आमचा नफा हे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांनी सिद्ध केले.
केज/प्रतिनिधी:मागच्या तीन गळीत हंगामापासून केज तालुक्यात गंगा माऊली शुगर सुरू झाला आणि शेतकऱ्यांच्या जीवनात खरोखरच क्रांती झाली हा कारखाना चालेल का नाही चालला तर भाव देईल का? असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना सुरुवातीला पडले मात्र अगदी कमी कालावधीत या कारखान्याने शेतकऱ्यांत विश्वास निर्माण केला त्याच वैशिष्ट्य देखील तसेच असून यावर्षीच्या गळीत हंगामात कारखान्याने आजपर्यंत २७०० रू. प्रति टन भाव दिला असून उद्या परत कारखाना १२० रु प्रमाणे दुसरा हप्ता शेतकऱ्यांना पेरणीसाठी जमा करण्यात आला असल्याचे कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांनी सांगितले.बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या ओळीप्रमाणे लक्ष्मणराव मोरे यांनी शेतकऱ्यांना भावाचा विश्वास दिला आणि शेतकऱ्यांनी हे अनुभवलं देखील आहे. दर पंधरा दिवसाला हा कारखाना रोख बील देत असल्याने हा विश्वास देखील शेतकरी, ऊस तोड मजूर व वाहतूकदार यांनाही आला असून यावर्षीच्या गळीत हंगामात कारखान्याने चांगले गाळप केले आहे मात्र या कारखान्यात केवळ साखरेचे उत्पादन असताना देखील शेतकऱ्यांना योग्य व वेळेत पैसे देण्याचे काम केल्याने सर्व शेतकरी गंगा माऊली शुगर या कारखान्यावर खुश आहेत. चेअरमन लक्ष्मणराव मोरे यांनी गळीत हंगामाच्या वेळी सांगितले होते की आपण पहिली उचल २७०० प्रमाणे देणारा असून पेरणीसाठी देण्यात येणारा दुसरा हप्ता आज १२० रु. प्रमाणे जमा करण्यात आला असून याचा फायदा पेरणीसाठी शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांच्या वेळेला म्हणजे पेरणीसाठी पैसे मिळणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात आले आहे. यामुळे कारखान्यावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.