ताज्या घडामोडी

४० वर्षांचा वनवास संपला! जिरायत खात्याची जागा केज नगरपंचायतीच्या ताब्यात; हारुणभाई इनामदार व सिताताई बनसोड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! ​छोट्या व्यवसायधारकांमध्ये नवचैतन्य; शहरात आनंदोत्सव!!

पाठलाग न्यूज / विशेष प्रतिनिधी:

४० वर्षांचा वनवास संपला! जिरायत खात्याची जागा केज नगरपंचायतीच्या ताब्यात; हारुणभाई इनामदार व सिताताई बनसोड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! ​छोट्या व्यवसायधारकांमध्ये नवचैतन्य; शहरात आनंदोत्सव!!

​केज/प्रतिनिधी (पाठलाग न्यूज): शहरातील छोट्या व्यवसायधारकांचा मागील ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला जागेचा आणि रोजीरोटीचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. केज शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘जिरायत खात्याची’ शासकीय जागा अधिकृतपणे केज नगरपंचायत प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. महसूल प्रशासनाने या जागेचे ताबा पत्र मंगळवारी (दि. ४ जून) पारदर्शकपणे नगरपंचायतीकडे हस्तांतरित केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारुणभाई इनामदार आणि नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांच्या सातत्यपूर्ण आणि अथक पाठपुराव्यामुळे केज नगरपंचायतीला हे ऐतिहासिक यश मिळाले आहे. या यशामुळे रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या गरीब व छोट्या दुकानदारांमध्ये आनंदाचे वातावरण असून शहरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. ​पत्रकार परिषदेत माहिती देताना गटनेते हारुणभाई इनामदार आणि नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांनी सांगितले की, मागील ४-५ वर्षांपासून शहरात अनेक विकासकामे सुरू आहेत, पण हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. या जागेवर आता सार्वजनिक प्रकल्प, छोट्या व्यवसायिकांसाठी गाळे आणि नागरिकांसाठी उपयुक्त सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ​सर्वपक्षीय नेते आणि प्रशासनाचे मोलाचे सहकार्य ​हा प्रश्न सोडवण्यासाठी आजी-माजी सर्वच ज्येष्ठ नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे दोन्ही नेत्यांनी आवर्जून नमूद केले. यामध्ये राज्याचे नेते ना. अजितदादा पवार, स्व. लोकनेते विलासरावजी देशमुख, माजी खासदार रजनीताई पाटील, स्व. विमलताई मुंदडा, विद्यमान खासदार बजरंगबप्पा सोनवणे, आमदार नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते रमेशरावजी आडसकर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले. ​प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, तलाठी साहिल इनामदार आणि नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी व कर्मचारी यांनी तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी रात्रीचा दिवस केला. तसेच, या प्रक्रियेला गती देणारे दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या कायदेशीर योगदानाचा या प्रसंगी कृतज्ञतेने उल्लेख करण्यात आला. जनविकास आघाडीच्या काळात केजच्या विकासाचा एक मोठा टप्पा पूर्ण झाल्याची भावना नेत्यांनी व्यक्त केली. ​या पत्रकार परिषदेला जनविकास परिवर्तन आघाडीचे गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेवक जलालभाई इनामदार, लखन हजारे, व्यापारी प्रतिनिधी महेश जाजू यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ४० वर्षांची फरफट थांबल्यामुळे तमाम केजवासीयांनी व छोट्या व्यवसायिकांनी महसूल प्रशासन, हारुणभाई इनामदार आणि श्रीमती सिताताई बनसोड यांचे जाहीर आभार मानले आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये