ताज्या घडामोडी

जनसामान्याचा एक लढवय्या, रांगडा, संयमी नेता : रमेशराव आडसकर.

पाठलाग न्युज /प्रतिनिधी :

जनसामान्याचा एक लढवय्या, रांगडा, संयमी नेता : रमेशराव आडसकर.

केज: तालुक्याला राजकीय नकाशावर आणणारे कै. माजी आमदार बाबुरावजी आडसकर यांचे सुपुत्र रमेशराव आडसकर यांचा आज जन्म दिवस. आता पर्यंत आपल्या बाढदिवासाला कधीही उत्सवी स्वरुप त्यांनी आणले नाही. वाढदिवस साधेपणानेच करा असा त्यांचा नेहमीच कार्यकर्त्यांना आग्रह असतो.देशात व राज्यात त्यावेळी कोरोनाच्या महाभयंकर महामारीत शासन स्तरावरुन प्रयत्न केले जात होते. परंतु सत्तेत नसतानाही आपली सामाजिक बांधिलकी मानत अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. रमेशराव आडसकर यांनी धारुर मधील स्वतःच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात मंजुर झालेल्या शंभर बेड च्या कोव्हीड केअर सेंटरला अत्यावश्यक सर्व सुविधा रमेशराव आडसकर यांनी पुरवल्या होत्या.

राज्यावर आलेले हे संकट सर्वांचेच आहे याची व्यापक जाणिव ठेवुन आडसकरांनी उचललेले पाऊलात माजी आमदार कै. बाबुरावजी आडसकरांच्या संस्काराची एक छटा या परिसरात पहावयास मिळाली होती.त्या ठिकाणी गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजनची सुविधा, रुग्णांच्या निवासा बरोबरच, नाश्ता, जेवन व अत्यावश्यक सेवा देवुन हजारो रुग्णांचे प्राण वाचविले हे विशेष होय. केजच्या राजकारणात स्वतःकडे कोणतेही महत्त्वाचे पद नसतांनाही दिड दशकापासून राजकारण व समाजकारणात आपला ठसा निर्माण करणारे रमेशराव आडसकर.त्यांचे वडील माजी आमदार स्व. बाबुरावजी आडसकर यांनी केज च्या राजकारण, सहकार, आणि शिक्षण क्षेत्रात १९६५ ते १९९० पर्यंत केज अंबाजोगाईच्या राजकारणावर मजबुत पकड निर्माण केलेली होती. कै. बापुसाहेब काळदाते विरुद्ध आडसकर ही लढत संपुर्ण देशात गाजली होती…! त्यातुनच हाबाडा या शब्दाची निर्मिती झाली ती आज तागायत राजकारणात चर्चिली जाते.ग्रामिण भागात आजही ग्रामपंचायत सेवा सहकारी सोसायटी, केज कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबा सहकारी साखर कारखाना या सर्वांच्या माध्यमातुन रमेशराव आडसकर खरे मास लिडर ठरलेलेआहेत याची प्रचिती ते नेहमीच देत असतात. अंबा सहकारी कारखान्याच्या माध्यमातुन अनेक भुमीपुऱ्यांना न्याय मिळाला. आसरडोह ब चनई सर्कल मधुन जि.प. सदस्य म्हणुन निवडुन आल्या नंतर त्यांचा राजकीय आलेख वाढतच राहिला. योगेश्वरी सुतगिरणी ते अंबासाखर चे चेअरमन हा प्रवास शेतकऱ्यांच्या जिवनाशी निगडीत असल्यामुळे ते नेहमीच शेतकऱ्यांच्या विकासासाठी झटतात. पक्षीय मतभेद बाजुला ठेवुन राजकारण कसे करावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे रमेशराव आडसकर आहेत. जि.प. चे उपाध्यक्ष असतांना ग्रामिण भागाशी त्यांची नाळ जुळली. यशवंत ग्राम समृद्धी योजनेतुन हजारो कामे केली. पहिल्यांदाच आलेल्या सर्व शिक्षा अभियानातुन बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जि.प. शाळांच्या नव्या इमारती निर्माण केल्या. वित्त आयोगाच्या माध्यमातुन अनेक रस्त्यांचे कामे पुर्ण केली. सर्व सामान्य माणुस हा केंद्रबिंदु माणुन काम केले. राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेआतही त्यांचा वावर आहे. पाणी फाँऊडेशनच्या कामात त्यांनी आनंदगांव, कळमअंबा, दिपेवडगांव डिघोळ, पळसखेडा या ठिकाणी प्रत्यक्ष श्रमदान करुन आर्थिक मदतीचा हात ही दिला हे विशेष होय. केज, अंबाजोगाई, माजलगांव या तालुक्यात विविध समाजाच्या लग्नात त्यांची उपस्थिती हे त्यांच्या सामाजिक व वैचारिक वृत्ती दिसुन येते. कोणतेही काम मनापासुन करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. कोव्हीड -१९ कोरोनाच्या महाभंयकर महामारीत केज, माजलगांव व अंबाजोगाईत प्रत्यक्ष जावुन गोर गरीब लोकांना अन्न धान्यांची मदत केली. माजलगांव मतदार संघातुन निसटता पराभव झाल्यानंतरही अगदी दुसऱ्याच दिवशी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आडसकर धावले होते हे लोक कधीही विसरणार नाहीत.माजलगांवच्या बाहेरचा उमेदवार असा उल्लेख असणारेच आडसकर सर्वप्रथम मतदार संघात पोहचले होते… मदतीला लागले होते हे विशेष होय. कोरोनाच्या वातावरणात धारुर माजलगांव ह्या परिसरातील सर्वच गांबाना भेटी देवुन मदतीचा आधार दिला. धारुर येथील कस्तुरबा गांधी कोव्हीड सेंटर गोर गरीब जनतेसाठी मोठा आधार ठरले होते. जेवन, नास्ता व सर्व अत्यावश्यक सोयी या ठिकाणी देवुन महत्वाचे काम केले. प्रसिद्धी माध्यमात न येता कोव्हीड सेंटर सुव्यवस्थित चालविणे हे त्यांच्या कडूनच शिकले पाहिजे. कोणतीही बनरबाजी न करता ते आपले काम करत होते .मतदार संघाचे आमदार नसलेले रमेशराव आडसकर जनतेच्या संकटात बरोबर होते.,त्यांच्या मदती साठी धावुन जात होते हे लोकांनी प्रत्यक्ष अनुभवले होते. लोकांचे पिक विमा असेल, अन्न धान्य वितरण असेल, आर्थिक दुर्बल घटक असेल, शेती व फळबागाचि शासकीय आर्थिक तरतुद असेल या सर्व प्रश्नासाठी आडसकर रस्त्यावर दिसतात. येत्या काळात या मतदार संघाचे नेतृत्व ते करतील यात कुणालाही शंका नाही. शिक्षण क्षेत्रातही केज, अंबाजोगाई धारूर व वडवणी तालुक्यात श्री. छञपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन शैक्षणिक बारसा जपण्याचे काम त्यांनी केले. प्राथमिक ते माध्यमिक शाळा सुरु करुन या भागात शैक्षणिक क्रांती केली. वसंत कनिष्ठ, शिवाजी कनिष्ठ, व बाबुरावजी आडसकर चरिष्ठ महाविद्यालय केजच्या माध्यमातुन उच्च शिक्षण ही याच भागात मिळवुन दिले. केजच्या शैक्षणिक क्षेत्रात शारदा इंग्लिश स्कुल नर्सिंग स्कुल, वसंत पाॉलिटेक्निक व आय टी.आय.व डी. फॉर्मसीचे शिक्षण संकुल निर्माण करुन ते आदर्श पद्धतीने चालविण्यासाठी त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चनाताई आडसकर या ही मदत करतात. केज शहराच्या वैभवात या शैक्षणिक इमारती भर पाडत तर आहेतच परंतु शैक्षणिक आलेख ही उंचावत आहेत. याच बरोबर धारूर मधील कस्तुरबागांधी ची प्रशस्त इमारत व केज मधील शारदा इंग्लीश स्कुलची प्रशस्त सुसज्ज इमारत या वास्तु कोव्हीड च्या काळातही रुग्णांच्या उपचारासाठी, समाजासाठी धावुन आल्या हे विशेष होय..! आज राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी मध्ये काम करत आहेत. शेतकरी, शेतमजुर, व्यावसायिक, युवक या सर्वांना आडसकर आपले वाटतात यातच त्यांचे खरे श्रेय आहे. गरीबातला गरीब माणुस त्यांच्या बंगल्यावर जावुन प्रत्यक्ष भेटु शकतो.त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चनाताई आडसकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या सदस्या असुन त्या ही शैक्षणिक क्षेत्रात शारदा इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून काम करत आहेत. पुतणे रुषीकेश भैया आडसकर व चिरंजिव रणजित दादा आडसकर हे सर्व सामाजिक, राजकीय कामात मदत करतात. सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या भागातील पेशंट आपले आहेत. केवळ प्रशासनावर अवलंबुन न राहता कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावलेले रमेशराब आडसकर जनतेच्या मनात कायम घर करून राहिलेले आहेत.! त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा..!

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये