ताज्या घडामोडी

दुचाकीसाठी पेट्रोलचा शोध ; अपघातात तरुणाचा बळी.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

दुचाकीसाठी पेट्रोलचा शोध ; अपघातात तरुणाचा बळी.           केज /प्रतिनिधी: तालुक्यातील औरंगपुर येथील तरुण विवेक सुधीर रानमारे वय २७ वर्षे हा दुचाकीवर पेट्रोल आणण्यासाठी आंबा साखर परिसरातील पेट्रोल पंपावर गेला होता परतताना रविवार रोजी सायंकाळी ११ च्या सुमारास वाजता टॅंकर दुचाकी यात जोराची धडक झाली यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला स्वराती रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्याचे निधन झाले. मागील चार दिवसांपासून पेट्रोल,डिझेल, सीएनजी चा सर्वत्र तुटवडा आहे गाडीत पेट्रोल आणण्यासाठी गेलेल्या तरुणांचा अपघातात बळी गेला. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून टॅंकर ताब्यात घेतले. तरुणावर औरंगपूर येथील शेतात सोमवार रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले घटनेने सर्वत्र व्यक्त होत आहे. अत्यंत शांत स्वभाव व हुशार व्यक्तीमत्व,लातुर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नाशिक येथे मेडीसीन कंपनीत कार्यरत होते तसेच हाडाचे चाळे बसवणे खांदे,गुडगा,मनकादुखने यावर उपचार करण्यात ते तरबेज होते, आजोबांचा वारसा जोपासत हजारो रुग्ण दुरुस्त केले होते.माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते सुधीर रानमारे यांचा तो मुलगा होता.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये