ताज्या घडामोडी

केजच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल! ‘”दिया” क्रिकेट अकॅडमी’ व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमचे दिमाखात लोकार्पण!!

पाठलाग न्युज.

केजच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल! ‘”दियाक्रिकेट अकॅडमी’ व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमचे दिमाखात लोकार्पण!!

​केज/प्रतिनिधी: केज तालुक्याच्या क्रीडा वैभवात एका नवीन अध्यायाची भर पडली असून, केज तालुक्यातील लव्हरी रोड, कानडी माळी येथे उभारण्यात आलेल्या ‘दिया क्रिकेट अकॅडमी’ व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य क्रिकेट स्टेडियमचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे . बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या शुभहस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. ​याप्रसंगी जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जतीन रहेमान, सोलापूरचे जिल्हा न्यायाधीश श्री. सुरजजी केंद्रे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार आणि केजचे पोलीस उपाधिक्षक व्यंकट राम यांसारख्या दिग्गज प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला अगळे -_वेगळे स्वरूप निर्माण झाले होते.

:​ग्रामीण खेळाडूंना मिळणार आंतरराष्ट्रीय संधी: ग्रामीण भागातील सुप्त अवस्थेत असलेल्या गुणवान खेळाडूंना स्थानिक पातळीवरच जागतिक दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने या अकॅडमीची निर्मिती करण्यात आली आहे. अकॅडमीचे सचिव आणि सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. दिनकर राऊत आणि अकॅडमीचे अध्यक्ष श्री. डी. बी. माळी यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमातून हे प्रशस्त स्टेडियम साकारले आहे. या उपक्रमाचे स्वागत करण्यासाठी केज येथील ‘हास्य क्लब’चे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​भविष्यात केजमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडतील – जिल्हाधिकारी: उद्घाटनपर भाषणात बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अकॅडमीच्या सुसज्ज सोयीसुविधांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “अशा दर्जेदार अकॅडमीमुळे केज तालुक्यातून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे क्रिकेटपटू तयार होतील, यात शंका नाही.”​कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनकर राऊत यांनी केले, तर सूत्रसंचालन हनुमंत भोसले यांनी केले. राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली. यावेळी तालुक्यातील क्रीडाप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये