ताज्या घडामोडी

देवगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

देवगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

​केज/प्रतिनिधी: केज तालुक्यातील देवगाव येथे भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. गावातील प्रमुख मान्यवर आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढली. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, ​गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी सकाळी देवगाव येथील समाज मंदिरासमोरील भव्य प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात निळ्या ध्वजाच्या ध्वजारोहणाने झाली. हे ध्वजारोहण कृष्णा बँकेचे चेअरमन तथा माजी जि.प. सदस्य विजयकांत भैय्या मुंडे, सुरेश गायकवाड (नवी मुंबई), उपसरपंच सुभाष मुंडे, रामू नागरगोजे, अमोल मुंडे आणि एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.​याप्रसंगी महामानव तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून ‘बुद्धवंदना’ घेण्यात आली. उपस्थितांनी महामानवांच्या विचारांना अभिवादन केले. भीम जयंती उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहार देऊन जंगी स्वागत केले. ​हा दिमाखदार सोहळा यशस्वी करण्यासाठी गावातील अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. यामध्ये प्रामुख्याने: ​डॉ. शरद गायकवाड, अर्जुन गायकवाड, अरुण कांबळे ​चिवळा गायकवाड, राणू कांबळे, लिबाजी गायकवाड ​दैवान कांबळे, विशाल गायकवाड, अजय कांबळे ​यांच्यासह अनेक भीम सैनिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन पत्रकार महादेव गायकवाड यांनी केले. या सोहळ्यामुळे संपूर्ण देवगाव परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये