ताज्या घडामोडी

“सत्याचा शोध आणि जनसामान्यांच्या प्रश्नांचा अविरत ‘पाठलाग'”

पाठलाग न्युज.

“सत्याचा शोध आणि जनसामान्यांच्या प्रश्नांचा अविरत ‘पाठलाग'”

​नमस्कार वाचकहो, ​आज १ मे. अवघ्या महाराष्ट्राचा गौरवशाली ‘महाराष्ट्र दिन’ आणि कष्टकऱ्यांचा ‘कामगार दिन’. याच मंगलदिनी ‘पाठलाग न्यूज’ आपल्या यशस्वी प्रवासाचा आणखी एक टप्पा पूर्ण करत आहे. वर्धापन दिनाचा हा क्षण केवळ आमच्या उत्सवाचा नसून, तो आम्हावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक वाचकाचा आणि हितचिंतकाचा सन्मान आहे. ​पत्रकारिता हे केवळ माहिती देण्याचे साधन नसून ते परिवर्तनाचे शस्त्र आहे, असे आम्ही मानतो. गेल्या वर्षभरात आम्ही केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर त्या बातम्यांच्या मुळाशी जाऊन सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. मग ते प्रशासनातील त्रुटी असोत, शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार असोत किंवा सामान्यांचे प्रलंबित प्रश्न; ‘पाठलाग न्यूज’ने नेहमीच आक्रमक पण संयमी भूमिका घेतली आहे. ​अन्याय जिथे असेल, तिथे आमचा ‘पाठलाग’ सुरूच राहील. केवळ समस्या मांडणे नव्हे, तर त्या सुटेपर्यंत त्यांचा पाठपुरावा करणे हेच आमचे ब्रीदवाक्य आहे. डिजिटल युगाच्या गर्दीतही विश्वासार्हता जपण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे आणि त्याला तुमच्या प्रतिसादाची मोलाची साथ लाभली आहे. ​आज या वर्धापन दिनी आम्ही संकल्प करतो – अधिक पारदर्शक, अधिक निर्भीड आणि अधिक लोकभिमुख पत्रकारितेचा! महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छांसह ‘पाठलाग न्यूज’वर असाच लोभ राहू द्या. ​– संपादक, पाठलाग न्यूज”

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये