केज येथे पाऊणतास रस्ता रोको : प्रशासनाच्या लेखी आश्वासानंतर आंदोलन मागे.
केज : केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघातीय मृत्यूनंतर निर्माण झालेल्या शंकामय बाबीचीं सखोल चौकशी करा, कानडी रोड नादुरुस्त रस्ता चोवीस तासात दुरुस्त करा व लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृह 15 ऑगस्ट पूर्वी केज नगरपंच्यायत कडे हस्तान्तरीत करा या तीन प्रमुख मागण्यासाठी केज विकास संघर्ष समितीने शुक्रवारी केज तहसील कार्यालयासमोरील महामार्गांवर पाऊणतास केलेले रस्ता रोको आंदोलन अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासानंतर मागे घेण्यात आले. वरील तिन्ही मागण्यासंदर्भात प्रशासनाने दखल घेवून लेखी आश्वासन दिले. या अंतर्गत मयत तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघात व मृत्यूचीविशेष चौकशी स्थानिक गुन्हा शाखेकडे सोपवल्याचे सांगण्यात आले व घटनेचे संपूर्ण सत्य शोधून काढले जाईल असे सांगण्यात आले. अपूर्ण असलेल्या कानडी रस्त्याचे दोन्ही बाजूचे पंखे भरुन येत्या 20 एप्रिल पूर्वी रस्ता काम पूर्ण करण्यात येईल तसेच लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृहाचे काम 15 ऑगष्ट पूर्वी पूर्ण करून ते केज नगरपंचायत कडे सोपवले जाईल असे लेखी आश्वासन संबंधित यंत्रनेने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, नासेर मुंडे, शेषराव घोरपडे, इंजि मोहनराव कराड, संपत वाघमारे, गौतम बचूटे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.