ताज्या घडामोडी

शिक्षण क्षेत्र हादरले!’शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा महास्फोट; ६०० हून अधिक बोगस शिक्षक, ४८ बड्या अधिकाऱ्यांना दणका!

PATHLAG NEWS.

शिक्षण क्षेत्र हादरले!’शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा महास्फोट; ६०० हून अधिक बोगस शिक्षक, ४८ बड्या अधिकाऱ्यांना दणका!

​जळगाव/नाशिक: शिक्षण विभागातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक ‘शालार्थ आयडी’ घोटाळा उघडकीस आला असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक विभागातील  एकट्या जळगाव जिल्ह्यात तब्बल ६०० हून अधिक शिक्षकांचे बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून शासनाच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आता नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आपला फास आवळण्यास सुरुवात केली असून, शिक्षण विभागातील तब्बल ४८ बड्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ​ याबाबतचा सविस्तर वृत्तांत  असा की,   शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या  वेतनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘शालार्थ आयडी’ मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील १० शाळांमधील मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनी संगनमत करून चक्क बोगस शिक्षकांच्या नावे आयडी मिळवले असल्याचे उघड झाले आहे . या माध्यमातून गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचा पगार लाटला गेला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने जळगाव गाठून महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. ​एसआयटीने (SIT) केलेल्या सखोल तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी या सर्व प्रक्रियेत प्रचंड अनियमितता केल्याचे सिद्ध होत आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ​११ उपशिक्षणाधिकारी ​,३ कक्षाधिकारी, ​वरिष्ठ व कनिष्ठ सहाय्यक अशा एकूण ४८ जणांना तीन दिवसांच्या आत सुनावणीसाठी हजर राहण्याचे सक्त  आदेश देण्यात आले आहेत.  ​विधिमंडळात या विषयावर जोरदार चर्चा झाल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले होते. मध्यंतरी एसआयटीची मुदत संपली होती, मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने या तपास पथकाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. यामुळे दोषी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे.

शासकीय तिजोरीवर डल्ला; दादा भुसे यांचे कडक आदेश! ​

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सर्व प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. संस्थाचालक आणि शिक्षण अधिकारी मिळून सरकारची लूट करत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही कडक कारवाईची मागणी होत होती. ​तपासाचे प्रमुख मुद्दे: ​बोगस आयडी मिळवण्यासाठी कोणत्या सॉफ्टवेअरचा किंवा लॉगिनचा वापर झाला? ​या प्रक्रियेत कोणत्या एजंटचा सहभाग आहे का? ​लुटलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम आता कोणाकडून वसूल केली जाणार? ​पुढील ३ दिवसांची सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, यात काही बड्या अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षण क्षेत्रातील या ‘वाळवी’चा नायनाट होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये