केज येथील न्यायालयीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा ‘कोनशिला समारंभ’ रविवारी; उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहणार उपस्थित.
केज | प्रतिनिधी: केज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातील नवीन न्यायालयीन इमारतीच्या विस्तारीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा कोनशिला समारंभ येत्या रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला असून, या ऐतिहासिक सोहळ्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगरचे मा. न्यायमूर्ती श्री. किशोर चंद्रकांत संत आणि माननीय न्यायमूर्ती श्री. अभय ज. मंत्री यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी मा. न्यायमूर्ती श्री. सिद्धेश्वर सुंदरराव ठोंबरे (मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर ) व प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. संभाजीराव शिवाजीराव शिंदे (निवृत्त मुख्य न्यायमूर्ती, राजस्थान उच्च न्यायालय) हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री. आनंद लक्ष्मीचंद यावलकर (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बीड) हे भूषवणार आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या या विस्तारीकरणामुळे केज परिसरातील पक्षकार आणि वकिलांची मोठी सोय होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून केज येथील जिल्हा न्यायाधीश-१ श्री. सुधीर बाबूराव भाजीपाले आणि केज वकील संघाचे अध्यक्ष अॅड. महादेव संपतराव लाड हे काम पाहत आहेत. या कार्यक्रमाचे वेळ आणि ठिकाण अनुक्रमे दिनांक: २९ मार्च २०२६ (रविवार) आणि वेळ: सकाळी १०:३० वाजता संपन्न होईल. स्थळ: अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय परिसर, केज. या सोहळ्यास जास्तीत जास्त नागरिकांनी व कायदेतज्ज्ञांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.