ताज्या घडामोडी

​बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानोबाराव विडेकर (गुरुजी) यांचे निधन.

पाठलाग न्युज.

​बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानोबाराव विडेकर (गुरुजी) यांचे निधन.

​केज: बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि केज तालुक्यातील विडा येथील ज्येष्ठ नागरिक ज्ञानोबाराव सोलेराव देशमुख (विडेकर), जे जिल्ह्याभरात ‘विडेकर गुरुजी’ म्हणून परिचित होते, त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शुक्रवारी २७ मार्च रोजी रात्री ८:३० वाजता वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ​एक तत्वनिष्ठ, मित भाषि आणि कर्तबगार नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती होती. ​विडेकर गुरुजी हे केवळ एक राजकारणी नसून एक तत्वनिष्ठ, सज्जन आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे मार्गी लावली. विशेषतः सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य मोलाचे ठरले. ​लोकसंग्रह आणि सामाजिक कार्य या सह ​त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. समाजातील सर्व स्तरातील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी जात-पात कधीच पाहिली नाही. त्यांच्या जाण्याने केवळ विडा गावच नव्हे, तर संपूर्ण बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ​विडेकर गुरुजी यांच्या पार्थिवावर शनिवारी (२८ मार्च) सकाळी ११: ३० वाजता त्यांच्या मूळ गावी, विडा येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ​”विडेकर कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात पाठलाग परिवार सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये