ताज्या घडामोडी

पत्नीच्या खून प्रकरणी नराधम पतीला जन्मठेप; केज न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल.

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

पत्नीच्या खून प्रकरणी नराधम पतीला जन्मठेप; केज न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल.

​केज | प्रतिनिधी: चारित्र्याचा संशय आणि माहेरहून पैशांची मागणी पूर्ण न झाल्याच्या रागातून स्वतःच्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या करणाऱ्या नराधम पतीला केज न्यायालयाने जन्मठेपेची अद्दल घडविली असून,केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला. याबाबतची सविस्तर माहिती असली की, ​ सदरची थरारक घटना केज तालुक्यातील ढाकेफळ येथील गावच्या वस्तीवर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३:२० वाजेच्या सुमारास घडली होती. आरोपी भगवान शाहूराव थोरात हा पत्नी आरती भगवान थोरात (वय २२ वर्षे) हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे. तसेच, प्लॉट खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी तिचा छळ करत होता. ​घटनेच्या दिवशी घरात कोणीही नसताना आरोपीने रागाच्या भरात धारदार कुऱ्हाडीने आरती हिच्या गळ्यावर आणि छातीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, आरतीचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला.हे क्रुर ​कृत्य केल्यानंतर आरोपी भगवान थोरात याने कुऱ्हाड घटनास्थळीच टाकून पळ काढला आणि थेट युसुफवडगाव पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे संपूर्ण केज तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. ​घटनेची माहिती मिळताच तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत आरती हिचा भाऊ अजय अशोक पवार यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ​एपीआय योगेश उबाळे यांनी या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाने मांडलेला पुरावा आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून, न्यायालयाने आरोपी भगवान शाहूराव थोरात याला पत्नीच्या खुनाबद्दल दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे: या निकालामुळे समाजात एक कडक संदेश गेला असून, गुन्हेगाराला कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. पीडित कुटुंबाला उशिरा का होईना पण न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये