Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बुलढाणा अर्बन बँक बंद होणार नाही! अफवांमुळे बीड जिल्ह्यात खातेदारांची दुसऱ्या दिवशीही प्रचंड गर्दी. ​व्यवस्थापनाकडून सर्व ठेवी सुरक्षित असल्याचा खुलासा; ग्राहकांना शांतता राखण्याचे आवाहन.

पाठलाग न्युज :

बुलढाणा अर्बन बँक बंद होणार नाही! अफवांमुळे बीड जिल्ह्यात खातेदारांची दुसऱ्या दिवशीही प्रचंड गर्दी.

​व्यवस्थापनाकडून सर्व ठेवी सुरक्षित असल्याचा खुलासा; ग्राहकांना शांतता राखण्याचे आवाहन.

प्रतिनिधी /​केज, बीड: बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बंद होणार असल्याच्या निराधार आणि समाज माध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे बीड जिल्ह्यातील केज, वडवणी आणि धारूर येथील शाखांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून आज देखील खातेदारांची मोठी गर्दी उसळली आहे. विशेषतः ज्यांनी सोने तारण कर्ज घेतले आहे, अशा ग्राहकांनी आपले सोने आणि ठेवी सुरक्षित परत मिळवण्यासाठी बँकेसमोर धाव घेतली आहे. ​जिल्ह्यात बुलढाणा अर्बन ‘बँकेचे कामकाज थांबणार आहे’ अशा खोट्या बातम्या वेगाने पसरल्या. यामुळे खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यामुळे कोणताही विचार न करता, आपले पैसे आणि सोने त्वरित काढून घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लोकांनी बँकेसमोर रांगा लावल्या आणि आजही बँक प्रशासनाने स्पष्टपणे खुलासा केल्यानंतरही ​केज शाखेसह अनेक ठिकाणी ही गर्दी इतकी वाढली की, बँकेचे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करून बंदोबस्त तैनात करावा लागला. कर्मचारी वाढीव वेळेत काम करूनही गर्दी कमी होत नसल्याचे चित्र होते. ​ बँक व्यवस्थापनाचा खुलासा:सर्व ठेवी सुरक्षित– ​या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन, बुलढाणा अर्बन पतसंस्थेच्या रिजनल मॅनेजर श्री मगरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्य परिस्थिती स्पष्ट केली. ​”बुलढाणा अर्बन पतसंस्था ही आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि मल्टी-स्टेट सोसायटी म्हणून कार्यरत आहे. ही बँक विशेषतः सोने तारण ठेवून खातेदारांना कर्ज देते. बँक बंद होणार असल्याची चर्चा पूर्णपणे खोटी असून, या केवळ अफवा आहेत. संस्थेचे व्यवहार नियमितपणे सुरू आहेत. आम्ही सर्व खातेदारांना आश्वस्त करतो की, त्यांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. ग्राहकांच्या सोयीसाठी आम्ही कामकाजाची वेळ वाढवली आहे, कृपया गर्दी न करता शांतता राखावी.” ​बुलढाणा अर्बन पतसंस्था ही सहकार क्षेत्रातील एक मोठी संस्था असून, तिच्या सुमारे ४८५ हून अधिक शाखा देशातील ८ हून अधिक राज्यांमध्ये कार्यरत आहेत. अशा मोठ्या संस्थेबद्दलच्या अफवांना बळी न पडण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन व्यवस्थापनाने पुन्हा एकदा केले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये