आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते मेंढपाळांच्या मेंढ्यासाठी औषधी व लसीचे मोफत वाटप मेंढपाळानी मेंढ्यासाठी मोफत औषध,लसीचा लाभ घ्यावा—प्रकाश जाडकर.
केज/प्रतिनिधी: बीड जिल्ह्यात सततचा पाऊस चालू असल्यामुळे बीड जिल्ह्यातील मेंढपाळांच्या मेंढ्यांना साथ रोगांचे आजार होत आहेत. केज मतदार संघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांनी महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाला तातडीच्या सूचना देऊन मेंढ्यांना रोग प्रतिबंधक लस उपलब्ध करून मेंढपाळांच्या मेंढ्यांना लसीचा डोस पाजून आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते कुंबेफळ येथे झाला यापूर्वी मेंढपाळांना खाजगी रुग्णालयातून औषधी आणून हजार रुपये खर्च करावे लागत होते आता मोफत औषध उपचार व लसी देण्यात येत आहेत याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार नमिता मुंदडा यांनी केले. मेंढपाळ बांधवांनी मोफत औषध उपचार व लसी घ्याव्यात असे आवाहन प्रकाश जाडकर यांनी केले कुंबेफळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चंदनसावरगाव पशुधन पर्यवेक्षक डॉ अनिकेत काटुळे , भाजप ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश जाडकर, सुरेश नांदे , गोपाळ मस्के, विष्णू थोरात, रामकृष्ण भंडारे, संदीप थोरात व परिसरातील मेंढपाळ उपस्थित होते.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.