Breaking Newsक्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शाश्रम शाळा च्या “आका”ला तात्काळ अटक करून त्याला साथ देणाऱ्या दोषींवर गंभीर गुन्हे दाखल करा. आत्महत्याग्रस्त कर्मचारी श्रीनाथ गीते च्या आईच्या मागणीनंतर सरकारकडून चौकशीला वेग.

पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी :

बीड च्या शाश्रम शाळा च्या “आका”ला तात्काळ अटक करून त्याला साथ देणाऱ्या दोषींवर गंभीर गुन्हे दाखल करा.

आत्महत्याग्रस्त कर्मचारी श्रीनाथ गीते च्या आईच्या मागणीनंतर सरकारकडून चौकशीला वेग.

प्रतिनिधी/ बीड : वडिलांच्या 5 सप्टेंबर 2010 मधील रहस्यमय मृत्यूनंतर शासनाकडून अनुकंपा धरतीवर नियुक्ती आदेश मिळवूनही संबंधित संस्था चालक तथा बीड जिल्ह्यातील आश्रम शाळांचा “आका” म्हणून ज्याची ओळख आहे त्या बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळाच्या साने गुरुजी ऊसतोड कामगार निवासी शाळेचा निलंबित मुख्याध्यापक उद्धव कराड व परळी येथील वसंत नगरच्या आश्रम शाळेचा संस्थाचालक संजय राठोड यांच्या आर्थिक, मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर दोन्ही संस्था चालकावर परळी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून, सदरच्या घटनेला एक महिना होऊनही आरोपी अद्याप फरार आहेत.

मयताच्या आईच्या निवेदनानंतर मात्र निवेदनात मागणी केल्याप्रमाणे आरोपींना तात्काळ अटक करून आरोपींना सहकार्य करणाऱ्या समाज कल्याण कार्यालयातील या प्रकरणात दोषी असलेले अधिकारी व दोन्ही संस्थेतील या प्रकरणी साथीदार असलेल्या मुख्याध्यापक यांची व संस्थांच्या कारभाराची तात्काळ चौकशी करून त्यांचेवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत असे निर्देश शासनातर्फे आदेशाद्वारे देण्यात आल्यामुळे आश्रम शाळा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मयताची आई श्रीमती सुनिता गोविंद गीते यांनी निवेदनातून नमूद केलेली माहिती अशी की, बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळाचे सानेगुरुजी ऊसतोड कामगार निवासी विद्यालय, केज, हे अनेक वर्षांपासून आणि सध्या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मानसिक व आत्महत्या पर्यंतच्या छळामुळे चर्चेत आहे. संस्थेचे अध्यक्ष व लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित मुख्याध्यापक पद एकाच व्यक्तीकडे असल्याने आणि त्यांची पत्नी सचिवपदावर प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक पदावर असल्याने शासनाच्या अनुदानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका मयत कर्मचाऱ्याच्या आईने यासंदर्भात पुरावे सादर करूनही अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ​शासनाच्या नियमांनुसार, एकाच व्यक्तीकडे एका संस्थेतील महत्त्वाचे दोन अधिकारपदे असू नयेत. मात्र, या शाळेत अध्यक्ष स्वतःच मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत, तर त्यांची पत्नी सचिव आणि मुख्याध्यापक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे शासनाकडून मिळणारे परिपोषण अनुदान, इमारत भाडे अनुदान आणि इतर सोयीसुविधांचा निधी मोठ्या प्रमाणात हडपल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. ​आरोपानुसार, या संस्थेने अनुकंपा तत्वावरील नोकऱ्या, बिंदू नामावली नोंदवही, आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी भरतीत गैरमार्गाचा अवलंब केला आहे. तसेच, संचमान्यतेत नसतानाही नवीन पदांना मान्यता मिळवणे, टीईटी (TET) पात्रता नसलेल्या शिक्षकांना मान्यता देणे आणि यासाठी मंत्रालयापासून ते स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांपर्यंत एक मोठी साखळी निर्माण करून आर्थिक व्यवहार केल्याचे पुरावे उपलब्ध झाल्याचे मयत श्रीनाथ गीते यांच्या कुटुंबाने सांगितले आहे. ​गीते कुटुंबियांचा न्याय अजूनही प्रलंबित आहे.​मयत कर्मचारी श्रीनाथ गीते यांच्या कुटुंबाने त्यांच्या अनुकंपा नियुक्ती प्रकरणाची चौकशी केली असता, हा सर्व गैरप्रकार उघडकीस आल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंबंधीचे पुरावे संबंधित अधिकाऱ्यांना सादर केले आहेत, तरीही अद्याप दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय गीते कुटुंबाने व्यक्त केल्यानंतर मात्र शासनाच्या समाज कल्याण सचिवालयाचे कक्षा अधिकारी यांनी दिनांक 10 9 20 25 रोजी संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांना तात्काळ चौकशी करून या प्रकरणातील दोषी संबंधितावर तात्काळ गंभीर गुन्हे दाखल करून शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मयत श्रीनाथ गीते यांच्या आईच्या गंभीर आरोपांनंतर, परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊनही आरोपी मात्र फरार असल्याचे समोर आले आहे. ​

या प्रकरणी शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे. जर यावर तात्काळ गंभीर चौकशी झाली नाही, तर शासनाकडे थेट तक्रार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गीते कुटुंबियांना लवकर न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे. ​या सर्व प्रकरणावर शासनाने त्वरित लक्ष घालून सखोल चौकशी करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे, जेणेकरून शासनाच्या निधीचा गैरवापर थांबेल आणि संस्थाचालकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या श्रीनाथ गोविंद गीते याला न्याय मिळेल.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये