फलोत्पादन (जिरायत खाते ) विभागाची जागा व्यापारी संकुलासाठी केज नग पंचायत कडे हस्तांतरीत.
व्यापारी व नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने केजच्या नागरिकांतून आनंदोत्सव!!
केज :केज राष्ट्रवादी काँग्रेसचे तडफदार नेते हारुणभाई इनामदार यांच्या संघर्षाला मोठे यश! केज/प्रतिनिधी: केज शहरातीला ३५ वर्षापासून जागे अभावी प्रलंबित असलेला व्यापारी संकुलाचा प्रश्न केज नगरपंचायत चे गटनेते हारुण इनामदार व नगराध्यक्षा श्रीमती सिताताई बनसोड यांच्या मोठ्या प्रयत्नातून व संघर्षातून जिराईत खात्याचा मोठा भूखंड केज नगरपंचायत कडे वर्ग करण्याची परवानगी मिळाल्यामुळे मार्गी लागला असून, शासनाच्या परवानगीने केज नगरपंचायत च्या नावाने सदरची सातबारा झाल्यामुळे केजवासियां मधून सरकार व केज नगरपंचायत चे आभार व्यक्त होत आहेत. दरम्यान, याविषयी केज नगरपंचायत चे गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण भाई इनामदार व केज नगरपंचायत च्या नगराध्यक्षा श्रीमती सीता ताई बनसोड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. केज नगरपंचायत मध्ये गटनेते, हारुन इनामदार व केज नगरपंचायत च्या विद्यमान अध्यक्षा मा. सौ. सिताताई बनसोड यांच्या नेत्रत्वा खाली केज शहरा चा विकास अगदी झपाट्याने होत असल्याचे दिसून येत असून, केज शहरातील अत्यंत्य सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे फलोत्पादन खात्यातील जागा व्यापारी संकुलासाठी मिळावी यासाठी मा. हारून इनामदार व नगराध्यक्षा मा. सौ. सिताताई बनसोड यांनी अथक परिश्रम करून मार्गी लावला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी फलोत्पादन ( जिराईत खात्याची ) जागा व्यापारी संकुलास दिली असल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ३५ वर्षापासून प्रलंबीत असलेला व्यापारी, छोटे व्यावसाय करणारे व्यापारी यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे केज शहरातील नागरीकातून मा. हारूनभाई इनामदार व नगराध्यक्षा मा. सौ. सिता ताई बनसोड यांचे अभिनंदन व शासनाचे आभार मानत आहेत. मा. हारून इनामदार व नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांच्या नेतृत्वा खाली केज शहराचा विकास होत असल्याने शहराचा चेहरा मोहरा बदलत असून, व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे केज वासिय व व्यापारी वर्गातून केज नगर पंचायत चे आभार व्यक्त होत आहे. तसेच केज च्या नागरिकांनी सदरचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.