Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ.दिपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या वक्तृत्व टीमवर अभिनंदनाचा वर्षाव. डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज च्या डॉ. ऋतुजा मुंडे सह डॉ. वेदिका माने चा अभिमानास्पद विजय!

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

डॉ.दिपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या वक्तृत्व टीमवर अभिनंदनाचा वर्षाव.

डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज च्या डॉ. ऋतुजा मुंडे सह डॉ. वेदिका माने चा अभिमानास्पद विजय!

कोल्हापूर: दिगंबर जैन बोर्डिंग, कोल्हापूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय शैक्षणिक महोत्सवातील आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि बौद्धिक मेजवानी म्हणून ओळखली जाणारी वक्तृत्व स्पर्धा यंदाही विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहात पार पडली असून,यामध्ये डॉ. दिपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजने आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत उत्कृष्ट यश संपादन केले असल्यामुळे डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय व वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी झालेल्या वक्ता विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रस्तुत वक्तृत्व स्पर्धेत सर्व उत्कृष्ट संघ म्हणून डॉ.दिपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजने मानाचा बहुमान पटकावला आणि संपूर्ण महाविद्यालयाचा गौरव उंचावला असल्याच्या भावना परिसरात व्यक्त केल्या जात आहेत. प्रस्तुत स्पर्धेचा आदर्श मार्गदर्शक पुरस्कार मिळवत डॉ. केदार तोडकर सर आणि डॉ.सेवाग्रा शर्मा सर यांनी आपल्या मार्गदर्शनाची श्रेष्ठता सिद्ध केली आहे तर,वैयक्तिक यश कु.ऋतुजा शिवदास मुंडे हिने “भारताचा इतिहास रचला जातोय की पुसला जातोय” या गहन व विचारप्रवर्तक विषयावर आपल्या ओजस्वी वक्तृत्वाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. डॉक्टर दीपक पाटील महाविद्यालयाच्या कु.वेदिका लहू माने हिला “नात्यांचे बदलते स्वरूप भारतीय कुटुंब व्यवस्था टिकवेल काय?” या भावस्पर्शी विषयावर प्रभावी सादरीकरण केल्याबद्दल उत्तेजनार्थ पारितोषिक बहाल करण्यात आले . डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वक्तृत्व टीमचे हे यश काही एका दिवसाचे फळ नाही, तर सततच्या परिश्रमांचे, सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे आणि संस्थेतील विद्वान प्राध्यापकांच्या अथक प्रयत्नांचे सार आहे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आले आहेत. डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी यांनी मिळवलेल्या या यशामागे संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय डॉ. दिपक पाटील सर, सचिव माननीय डॉ. स्वाती पाटील मॅडम, व्यवस्थापकीय संचालिका माननीय डॉ. स्मिता पाटील मॅडम आणि प्राचार्य माननीय डॉ. नितीन ताटपूजे सर आणि सर्व अध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले असून, यामुळेच विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात प्रचंड भर पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.ही कामगिरी केवळ एक स्पर्धेतील यश नाही, तर आपल्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. ही झेप पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी, यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा या विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करावे आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात. अशी भावना महाविद्यालयाच्या मॅनेजमेंटने व्यक्त केली असून, डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक व वैद्यकीय महाविद्यालयच्या वक्तृत्व टीमचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये