सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या राकेश केशव नावाच्या वकिलावर कडक कार्यवाही करा – अश्रूबा खरात.
केज/ प्रतिनिधी:जातीय द्वेषातून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासोबत राकेश केशव नावाच्या वकिलाने गैरवर्तन केले त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर)पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा.भूषण गवई यांच्यावर जातीय मानसिकतेने राकेश केशव नावाचा वकील धावून गेला आणि तो पायातला बूट काढणार त्याचवेळी न्यायालयातील सुरक्षारक्षक त्याच्या दिशेने धावले व न्यायालयाबाहेर नेले त्यामुळे मोठा अनर्थ टळला सनातन का अपमान नही सहेंगा हिंदुस्तान अशा घोषणा सडलेल्या मनोवादी वकिलांनी यावेळी दिल्या होत्या, त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाच्या वतीने या वकिलाचा जाहीर निषेध करून या वकिलावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी दि.०९.१०.२०२५ रोजी केज येथील तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय नेते दीपक (भाऊ) निकाळजे यांच्या आदेशाने व मराठवाडा अध्यक्ष भगवंत आप्पा वायबसे यांच्या मार्गदर्शनाखाली दिले आहे.या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या मराठवाडा महिला अध्यक्षा श्रीमती आम्रपाली गजेशिव, मराठवाडा प्रवक्ते ज्ञानेश्वर गिरी, बीडचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जाधव,केज तालुका अध्यक्ष आश्रुबा खरात,आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.