Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

केज च्या राजकारणात समता, बंधुता, आणि एकतेचे दर्शन: मा. हारुणभाई इनामदार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विविध पक्षाच्या नेत्यांची शुभेच्छा देण्यासाठी गर्दी!

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

केज च्या राजकारणात समता, बंधुता, आणि एकतेचे दर्शन: मा. हारुणभाई इनामदार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विविध पक्षाच्या नेत्यांची शुभेच्छा देण्यासाठी गर्दी!

​केज : जनसामान्यांचे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे चौकात, जनविकास परिवर्तन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा केज नगरपरिषदेचे नगरसेवक आणि भावी नगराध्यक्ष हारुणभाई इनामदार यांचा वाढदिवस केज शहरात आज पहाटे ख्वाजाबाबाला साकडे घातल्यानंतर व चादर चढवल्यानंतर सकाळपासूनच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केजच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ते शहरात ठीक ठिकाणी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देत, केजच्या राजकारणातील सौहार्दाचे वातावरण दिसून आले. मा. हारुणभाई इनामदार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी केज शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते रमाकांत (बाप्पू) मुंडे यांचा समावेश होता, ज्यांनी इनामदार यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ​यावेळी केजच्या नगराध्यक्षा सिताताई बनसोड, सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. त्रिंबकराव चाटे, नगरसेविका पद्मनीबाई शिंदे, राजुभाई इनामदार, महेश जाजू आणि श्रीधर खोत हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच, पत्रकारानीही आपली उपस्थिती नोंदवली होती. ​यावेळी, उपस्थितांनी हारुणभाई इनामदार यांनी केज शहराच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माननीय अरुण भाई इनामदार यांचा वाढदिवस सोहळा म्हणजे केजच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला एक महत्त्वपूर्ण क्षण ठरत असल्याच्या प्रतिक्रिया केज शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये