Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कै.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे अवचित्य साधून नांदूर घाट जि.प. शाळेची ऐतिहासिक सहलीचे आयोजन. भाजपाचे नेते संतोष दादा हंगे यांनी सहलीच्या खर्चासह दिल्या शुभेच्छा! ७५ वर्षांच्या परंपरेत प्रथमच लांब पल्ल्याचा प्रवास;लोकसहभागातून विद्यार्थ्यांचा आनंददायी अनुभव.

पाठलाग न्यूज/ प्रतिनिधी :

कै.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे अवचित्य साधून नांदूर घाट जि.प. शाळेची ऐतिहासिक सहलीचे आयोजन.

भाजपाचे नेते संतोष दादा हंगे यांनी सहलीच्या खर्चासह दिल्या शुभेच्छा!

७५ वर्षांच्या परंपरेत प्रथमच लांब पल्ल्याचा प्रवास;लोकसहभागातून विद्यार्थ्यांचा आनंददायी अनुभव.

प्रतिनिधी/ केज : ७५ वर्षांच्या परंपरेत प्रथमच लांब पल्ल्याचा प्रवास; लोकसहभागातून विद्यार्थ्यांचा आनंददायी अनुभव म्हणून प्रेरणादायी ठरत असलेल्या केज तालुक्यातील नांदूर घाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला असल्याची चर्चा असलेल्या नांदुर घाट जिल्हा परिषद शाळेच्या तब्बल ७५ वर्षांच्या वाटचालीत प्रथमच विद्यार्थ्यांची लांब पल्ल्याची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली असून, या ऐतिहासिक सहलीसाठी विद्यार्थी उत्साहात रवाना झाले असल्याचे चित्र पहावयास मिळाले. या सहलीसाठी लागणाऱ्या एसटी बसचा संपूर्ण खर्च भाजपाचे नांदुर घाट जि प सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष दादा हांगे यांनी स्वखर्चाने उचलला आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून संतोष दादा हंगे यांनी पुढाकार घेऊन हा सामाजिक उपक्रम राबविला आहे. लोकसहभागातून आनंदाचा प्रवास ही सहल यशस्वी करण्यासाठी नांदुर घाट गावातील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पत्रकार श्रीकांत जाधव यांनी स्वखर्चाने दोन पाण्याचे बॉक्स उपलब्ध करून दिले. ७५ वर्षांनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या लांबचा प्रवास होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही विशेष आनंद व उत्साहाचे वातावरण दिसून आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी सर्व सहलीला सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. ते म्हणाले, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बाहेरील जग पाहण्याची व नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. संतोष दादा हांगे व श्रीकांत जाधव यांच्यासारख्या व्यक्तींमुळेच सर्वसामान्य घरातील मुले आज या आनंदाच्या प्रवासाचा अनुभव घेऊ शकली आहेत. यावेळी संतोष दादा हांगे म्हणाले, स्व. मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत गोरगरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. या सहलीसाठी शिक्षकवृंद, ग्रामस्थ व पालकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष दक्षता घेण्यात आली असल्याचे संतोष दादा हंगे यांनी सांगितले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये