ताज्या घडामोडी

पाठलाग न्यूज एक्सक्लुझिव्ह: शिक्षणाचा ‘महाघोटाळा’! ​ १५०-२०० कोटींचा दणका, ८४१ बोगस शिक्षक अन् ‘अणूबॉम्ब’चे ताशेरे! बीडच्या शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्यासह १५ जणांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

पाठलाग न्यूज एक्सक्लुझिव्ह: शिक्षणाचा ‘महाघोटाळा’! ​

१५०-२०० कोटींचा दणका, ८४१ बोगस शिक्षक अन् ‘अणूबॉम्ब’चे ताशेरे!

बीडच्या शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्यासह १५ जणांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.

​विशेष प्रतिनिधी | पाठलाग न्यूज बीड / नाशिक: ​राज्यभरातील शिक्षण क्षेत्र हादरवून सोडणाऱ्या १७० कोटींच्या ‘बोगस शालार्थ आयडी’ महाघोटाळ्यात न्यायालयीन स्तरावर शिक्षण क्षेत्रातील गुन्हेगारीचे आरोप असलेल्या आरोपींना सर्वात मोठा दणका बसला आहे! बीडच्या योजना विभागातील शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्यासह १५ हायप्रोफाईल आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड सत्र न्यायालयाने अतिशय कठोर ताशेरे ओढत फेटाळून लावले आहेत. ​न्यायाधीश के. जी. जोशी यांच्या न्यायालयाने सुनावलेला हा निकाल म्हणजे शिक्षण माफियांच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या छातीवर पडलेला थेट हातोडा ठरत आहे! ​@ न्यायालयाने सांगितले: “देश उद्ध्वस्त करायला अणूबॉम्बची गरज नाही…” ​या सुनावणीदरम्यान न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या भीषण स्वरूपावर अत्यंत कठोर आणि डोळ्यात अंजन घालणारे शब्द वापरले आहेत. जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने म्हटले:– ​”कोणत्याही राष्ट्राचा विनाश करण्यासाठी अणूबॉम्बची अजिबात गरज नसते, त्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेत खोलवर भ्रष्टाचार रुजवणेच पुरेसे असते! ज्ञानाची मंदिरे असणाऱ्या आणि शिक्षणासारख्या पवित्र शाळेच्या प्रांगणात जेव्हा गुन्हेगारी घडते, तेव्हा केवळ त्या वास्तूची पवित्रता नष्ट होत नाही, तर भावी पिढीच्या चारित्र्याचा आणि राष्ट्राच्या भविष्याचा पाया ढासळतो. हा निव्वळ तांत्रिक गुन्हा नसून सरकारी तिजोरीची आणि जनतेच्या पैशांची झालेली पद्धतशीर लुटालूट आहे!” ​न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक ‘पी. चिदंबरम विरुद्ध ईडी (२०१९)’ आणि ‘स्टेट विरुद्ध अनिल शर्मा (१९९७)’ या निवाड्यांचा दाखला देत स्पष्ट केले की, पद आणि प्रभावाचा वापर करून इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट केले जाऊ शकतात व साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो. त्यामुळे आरोपींची ‘पोलिस कोठडीत’ (Custodial Interrogation) चौकशी अत्यंत आवश्यक आहे. ​@ बीडच्या श्रीमती शिक्षणाधिकाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार! ​बीडमध्ये योजना विभागात कार्यरत असलेल्या किरण कुंवर या जळगावमधील गुन्हा दाखल झाल्यापासून बीडच्या शिक्षण योजना कार्यालयाकडे फिरकलेल्याच नाहीत. कागदोपत्री त्या गैरहजर असतानाही बीडचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जितीन रहेमान यांनी अद्याप त्यांच्यावर कसलीच कारवाई केली नाही, नव्हे, मेहर नजर ठेवली असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आता किरण कुंवर यांच्यावर अटकेची टांगती तलवार टांगलेल्या अवस्थेत हेलकावे घेत आहे. ​बीडमधील शिक्षणाधिकाऱ्यांची ‘काळी मालिका’: ​नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारी हे दोन शिक्षणाधिकारी आधीच याच घोटाळ्यात निलंबित आहेत, तर, ​माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर आधीपासूनच गजाआड आहेत, ​आता किरण कुंवर यांचा जामीन फेटाळल्याने बीडच्या शिक्षण विभागाचा बोगस कारभार आता पूर्णपणे चव्हाट्यावर आला असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. ​& धक्कादायक खुलासे:— कागदावरच सुरू होती शाळा! ​तपासादरम्यान अत्यंत हादरवणारी माहिती समोर आली आहे:– ​शरद दयाराम शिंदे (मध्यस्थ/संस्थाचालक): शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे आवक रजिस्टर आणि नाशिक रोड पोलिस ठाण्याचे CCTV फुटेज तपासले असता, ८ शाळांमधील ५१ कर्मचाऱ्यांच्या नावांत बेकायदेशीर फेरफार करून नोंदी घुसडल्याचे उघड झाले आहे. ​मनोज रामकृष्णा पाटील (संस्थाचालक): याच्याशी संबंधित ३ शाळांमधील ४८ कर्मचारी या गुन्ह्यात अडकले असून २१ जणांचे शालार्थ आयडी पूर्णपणे बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे बीड जिल्ह्यातील एका तालुक्यातील शाळेप्रमाणेच ‘स्वामी समर्थ माध्यमिक शाळा, पारोळा’ ही शाळा प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही! कागदावर शाळा दाखवून शासनाची कोट्यवधींची लूट सुरू होती. ​& कोणाला दणका आणि कोणाला दिलासा? ​अटकपूर्व जामीन फेटाळलेले १५ संशयित (कारवाईच्या रडारवर):– १. किरण कुंवर (शिक्षणाधिकारी) २. भाऊसाहेब चव्हाण (शिक्षणाधिकारी) ३. शरद दयाराम शिंदे (संस्थाचालक/मध्यस्थ) ४. मनोज रामकृष्ण पाटील (संस्थाचालक) ५. विनोद तराळ ६. प्रदीप शिंगणे ७. राहुल पवार ८. मनिष कदम (लेखाधिकारी) ९. अविनाश पाटील १०. प्रवीण अहिरे ११. भास्कर पाटील १२. देवीदास महाजन १३. मनिक्षी गीरी १४. अमोल कुलकर्णी १५. रामकृष्ण पाटील ​टीप: शिक्षक अतुल पवार आणि उमेश पवार या दोघांचा जामीन अर्ज मात्र न्यायालयाने मंजूर केला आहे.) ​@@ एसआयटी (SIT) मॅनेज करण्याचे प्रयत्न सुरु? ​बीडमधील अनेक संस्थाचालक आणि मध्यस्थ सध्या या १७० कोटींच्या घोटाळ्यातून स्वतःची मान सोडवण्यासाठी ‘विशेष तपास पथक’ (SIT) मॅनेज करण्याच्या प्रयत्नात असल्याची खळबळजनक चर्चा शिक्षण वर्तुळात चर्चिली जात आहे. मात्र, न्यायालयाने दाखवलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे आता शिक्षण माफियांचे धाबे दणाणले आहेत. ​बीड आणि जळगावच्या या महाघोटाळ्याचे धागेदोर आणखी कुठे कुठे पोहोचतात? कुणाकुणाच्या मुसक्या आवळल्या जातात? यावर ‘पाठलाग न्यूज’ची बारकाईने नजर असणार आहे! हे निश्चित!

 

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये