ताज्या घडामोडी

भविष्य निर्वाह निधीचे  बिल मंजूर करण्यासाठी १ हजार रुपयांची लाच घेणारी मुख्याध्यापिका गजाआड; बीडच्या जिल्हा न्यायालयाने सुनावली ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा!

पाठलाग न्यूज / विशेष प्रतिनिधी :

भविष्य निर्वाह निधीचे  बिल मंजूर करण्यासाठी १ हजार रुपयांची लाच घेणारी मुख्याध्यापिका गजाआड; बीडच्या जिल्हा न्यायालयाने सुनावली ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा!

​बीड : जिकडे तिकडे लाचखोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असतानाच, बीडच्या शिक्षण विभागात भविष्य निर्वाह निधीतून (PF) दोन लाख रुपयांची ना-परतावा रक्कम मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या बिलावर सही करण्याच्या मोबदल्यात १ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या केंद्रीय मुख्याध्यापिकेला बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश-४ एस. एस. घोरपडे यांनी हा ऐतिहासिक आणि  महत्त्वाचा निकाल दिल. ​न्यायालयाने आरोपी मुख्याध्यापिकेला दोन वेगवेगळ्या कलमांखाली दोषी ठरवत खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे: ​कलम ७ अन्वये: ५ वर्षे सश्रम कारावास व १०,००० रुपये दंड. दंड न भरल्यास अतिरिक्त १ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा.​कलम १३(१)(डी) अन्वये: ५ वर्षे सश्रम कारावास व १०,००० रुपये दंड. दंड न भरल्यास अतिरिक्त १ वर्ष साध्या कारावासाची शिक्षा. ​ याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की, ​श्रीमती मीनाक्षी रमेश वेदपाठक (केंद्रीय मुख्याध्यापिका, निपाणी जवळका, ता. गेवराई, जि. बीड; रा. विद्यानगर पूर्व, बीड) असे शिक्षा झालेल्या आरोपी महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. ​फिर्यादीने आपल्या भविष्य निर्वाह निधीतून (PF) २ लाख रुपये ना-परतावा रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता. सदर मंजुरी मिळाल्यानंतर हे बिल गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती गेवराई यांच्याकडे सादर करण्यात आले. मात्र, या बिलावर केंद्रीय मुख्याध्यापिका मीनाक्षी वेदपाठक यांची सही नसल्याने ते बिल परत करण्यात आले होते. ​या नंतर फिर्यादीने गढी येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय  शाळेत जाऊन मुख्याध्यापिका श्रीमती  वेदपाठक यांची भेट घेतली व बिलावर सही करण्याची विनंती केली. त्यावेळी वेदपाठक यांनी बिलाच्या तिन्ही प्रती स्वतःकडे घेत, “मी बिलावर फुकट सही करणार नाही, मला सही करण्याच्या बदल्यात  एक हजार रुपये द्यावे लागतील,” अशी उघड मागणी केली व पैसे दिल्याशिवाय सही करणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. ​लाचेच्या मागणीनंतर लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), बीड यांच्याकडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून १० फेब्रुवारी २०१५ रोजी पंचायत समिती, गेवराई येथे सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका मीनाक्षी वेदपाठक यांना रंगेहात पकडण्यात आले व त्यांच्याकडील संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. ​या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक विनय रामचंद्र बहिर यांनी प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.​  ​न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये तक्रारदार, पंच, गटशिक्षणाधिकारी, सक्षम अधिकारी आणि तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. ​सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि मांडलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. ​: या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील ॲड. बी. एस. राख यांनी सरकार पक्षाची बाजू सक्षमपणे मांडली. त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांचे मार्गदर्शन लाभले. ​तपासी अधिकारी व सहकार्य: पोलीस निरीक्षक विनय रामचंद्र बहिर यांनी तपास केला, तर पैरवी अधिकारी ऋषिकेश सानप आणि प्रदीप सुरवसे (पोलीस कॉन्स्टेबल) यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये