ताज्या घडामोडी

केज न्यायालयात लाचप्रकरणातील आरोपी क्र. ४ चा हजेरीमाफीचा अर्ज ना मंजूर; पकड वॉरंट जारी!

पाठलाग न्युज.

केज न्यायालयात लाचप्रकरणातील आरोपी क्र. ४ चा हजेरीमाफीचा अर्ज ना मंजूर; पकड वॉरंट जारी!

​केज /विशेष प्रतिनिधी: केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) विशेष खटल्यामध्ये परवा एक महत्त्वपूर्ण घडामोड झाली आहे. न्यायालयाने आरोपी क्रमांक ४ चा हजेरीमाफीचा अर्ज फेटाळून लावत त्याच्याविरुद्ध गैरजामीनपात्र पकड वॉरंट (Non-Bailable Warrant / N.B.W.) जारी करण्याचे आदेश पारित केले आहेत. ​काय आहे प्रकरण? गजानन शिक्षण प्रसारक मंडळ, तांबवा (ता. केज) येथील निवृत्त शिक्षकाचे थकलेले वेतन व सेवापूर्तीचे लाभ देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी महाराष्ट्र शासन विरुद्ध अशोक हरिभाऊ चाटे व इतर (Spl. Case No. 0000009/2024, CNR No: MHBI180001392024) असा विशेष खटला न्यायालयात सुरू आहे. ​न्यायालयातील घटनाक्रम: दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, केज यांच्या न्यायालयात पार पडली. सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्ता आणि आरोपींचे वकील उपस्थित होते. ​या वेळी आरोपी क्रमांक ४ च्या वतीने (१९/ड अन्वये) आजच्या सुनावणीस गैरहजर राहून हजेरीमाफी मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु, न्यायालयाने सदर अर्ज अमान्य (ना मंजूर) केला. न्यायालयाने गंभीर दखल घेत निशाणी १ वर आरोपी क्रमांक ४ विरुद्ध पकड वॉरंट जारी करण्याचा आदेश जारी केला आहे. ​पुढील सुनावणी २८ सप्टेंबरला– न्यायालयाने आरोपी क्र. ४ ला पकड वॉरंट बजावण्याचे आदेश दिल्यानंतर आता या विशेष खटल्याची पुढील सुनावणी २८ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये