ताज्या घडामोडी

वाशी पोलीस ठाण्याचा स्तुत्य उपक्रम: गणेश मंडळांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांकास ५१ हजारांचे पारितोषिक.

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी :

वाशी पोलीस ठाण्याचा स्तुत्य उपक्रम: गणेश मंडळांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांकास ५१ हजारांचे पारितोषिक.

शंकर शिंदे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन वाशी.

​वाशी /विशेष प्रतिनिधी: गणेशोत्सव शांततामय, पर्यावरणपूरक आणि सामाजिक सलोखा जपत विधायक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी वाशी पोलीस ठाण्याच्या वतीने सन २०२६ मधील गणेशोत्सवा निमित्त विशेष ‘गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम तीन गणेश मंडळांना रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी दिली आहे. ​गणेशोत्सव काळात मंडळांकडून राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे १०० गुणांच्या निकषांवर मूल्यमापन केले जाणार आहे. ​पारितोषिकांचे स्वरूप ​प्रथम क्रमांक: ₹ ५१,०००/- (रोख) व प्रशस्तीपत्र ​द्वितीय क्रमांक: ₹ ३१,०००/- (रोख) व प्रशस्तीपत्र ​तृतीय क्रमांक: ₹ २१,०००/- (रोख) व प्रशस्तीपत्र ​मूल्यमापनाचे १०० गुणांचे मुख्य निकष ​मूर्ती व मंडप सुरक्षा: नियमानुसार गणेशमूर्तीची स्थापना, सुरक्षित स्टेज, विद्युत यंत्रणा, अग्निसुरक्षा यंत्रणा आणि आपत्कालीन उपाययोजना. ​पर्यावरण संवर्धन: प्लास्टिकमुक्त उत्सव, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, जलसंवर्धन आणि पर्यावरणपूरक सजावट. ​सामाजिक व सांस्कृतिक वारसा: महाराष्ट्राची परंपरा, लोककला, इतिहास जपणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन. ​युवा व महिला सक्षमीकरण: युवाशक्तीसाठी करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि महिला-विद्यार्थी सक्षमीकरणाचे उपक्रम. ​राष्ट्रीय एकात्मता: सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि शांतता जपणाऱ्या उपक्रमांना विशेष प्राधान्य. ​शांततामय विसर्जन: डीजेमुक्त, ध्वनीप्रदूषणरहित, पारंपारिक व संस्कृतीप्रधान विसर्जन मिरवणूक. ​”गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण रक्षण आणि शांतता जपली जावी हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.” — शंकर शिंदे (पोलीस निरीक्षक, वाशी पोलीस ठाणे)

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये