कोल्हापूर / पाठलाग न्यूज प्रतिनिधी: कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कोल्हापूर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘देशभक्त पद्मश्री रत्नाप्पाण्णा कुंभार राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०२६’ मध्ये डॉ. ऋतुजा शिवदास मुंडे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत उत्तेजनार्थ पारितोषिक आणि मानाचा ‘वाणीरत्न चषक’ पटकावला आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी नाईट कॉलेज, कोल्हापूर येथे पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विविध महाविद्यालयांतील उत्तमोत्तम वक्त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत डॉ. ऋतुजा मुंडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण, परखड व ओघवत्या वक्तृत्वशैलीच्या जोरावर परीक्षकांची व उपस्थितांची दाद मिळवली. त्यांच्या या यशाबद्दल त्यांना नाईट कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने देण्यात येणारे उत्तेजनार्थ पारितोषिक आणि ‘वाणीरत्न चषक’ देऊन गौरविण्यात आले. डॉ. ऋतुजा मुंडे यांच्या या चमकदार कामगिरीबद्दल व मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘पाठलाग न्यूज’ परिवाराकडून डॉ. ऋतुजा शिवदास मुंडे यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.