ताज्या घडामोडी

रमाकांत बापू मुंडे : निष्ठा, माणुसकी आणि माणसं जोडणारा लोकसंग्राहक.

पाठलाग न्यूज/ प्रतिनिधी:

रमाकांत बापू मुंडे : निष्ठा, माणुसकी आणि माणसं जोडणारा लोकसंग्राहक.

​विशेष प्रतिनिधी | पाठलाग न्यूज ​केज (बीड) : राजकारणात सत्ता आणि पदे येतात-जातात; परंतु सर्वसामान्यांच्या मनात निर्माण केलेले आपलेपणाचे स्थान आणि कमावलेली माणसं हीच खरी संपत्ती असते, हे केज तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्त्व रमाकांत बापू मुंडे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांचा वारसा जपत, राजकीय आव्हानांच्या काळातही निष्ठेशी तडजोड न करता समाजकारण करणारे एक खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ​रमाकांत बापू मुंडे यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी पार्श्वभूमी लाभली आहे. ९० च्या दशकात शिक्षण, सहकार आणि राजकारण सारख्या सर्वच क्षेत्रात प्रभावी ठरलेले त्यांचे ज्येष्ठ बंधू बीड जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष विक्रम बाप्पा मुंडे यांचा वारसा पुढे चालवताना बापूंनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. केज तालुक्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळात त्यांनी स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आमच्या अक्का कै. लक्ष्मी अक्का मुंडे यांचे नावे सुरू केलेले केज येथील लक्ष्मी नर्सिंग कॉलेज हा वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अभिनंदनचा विषय समोर आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये रमाकांत बापूंचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. गोपीनाथरावांच्या आकस्मिक निधनानंतर आणि २०१९ नंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये अनेक राजकीय वाटचाली बदलल्या; मात्र रमाकांत बापूंनी पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे खंबीरपणे उभे राहत ‘दिलेला शब्द’ पाळला. सत्ता असो वा नसो, निष्ठेला प्राधान्य देणारा नेता म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली. ​सामाजिक व शैक्षणिक योगदान व्यावसायिक क्षेत्रात यश मिळवतानाच त्यांनी व्यवसायाला माणसं जोडण्याचे माध्यम बनवले. पत्नी सौ. उषाताई मुंडे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून बजावलेली कामगिरी आणि चिरंजीव मधूर मुंडे यांच्या माध्यमातून पुढच्या पिढीने स्वीकारलेली सामाजिक बांधिलकी, यामुळे मुंडे कुटुंबाची नाळ कायम जनतेशी जोडलेली राहिली आहे. ​सध्याच्या राजकारणात पद आणि सत्तेपासून काहीसे दूर असले, तरी बापूंचा जनसंपर्क आणि सामाजिक वावर तितकाच दांडगा आहे. वाढदिवसानिमित्त केज तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, ‘माणसं जोडणारा, जिभेवर सतत खडीसाखरेचा खडा असणारा आणि निष्ठा जपणारा नेता’ म्हणून त्यांचे स्थान अबाधित आहे. सुखदुःखात सतत आपल्या मित्रांना व सहकार्यांना” तुडुंब” देणाऱ्या रमाकांत बापूंना’ पाठलाग परिवार व पृथ्वी प्रतिष्ठान तर्फे लक्ष लक्ष शुभेच्छा!!

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये