कै.चंद्रकलाताई गदळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दहिफळमध्ये वडमाऊली देवी परिसरातकीर्तनाचा कार्यक्रम.
केज / प्रतिनिधी : केज तालुक्यातील दहिफळ-वडमाऊली येथे वडमाऊली देवी परिसरात कै. चंद्रकलाताई सुखाहारी गदळे यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दहिफळ-वडमाऊली येथील कै. चंद्रकलाताई सुखाहारी गदळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई येथील भाषाप्रभू ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील हे यावेळी उपस्थित भाविकांना कीर्तनातून मार्गदर्शन करणार आहेत. कै. चंद्रकलाताई गदळे या दहिफळ-वडमाऊली येथील सेवानिवृत्त प्राचार्य तथा शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. सुखाहारी (तात्या) गदळे यांच्या पत्नी होत. तसेच भाजपा युवा मोर्चाचे केज तालुकाध्यक्ष राहुलभैया गदळे व जयदत्त गदळे यांच्या त्या मातोश्री होत. ह.भ.प. सुखाहारी (तात्या) गदळे यांनी स्थापन केलेल्या शिवप्रतिष्ठान संस्थानच्या भव्य परिसरात हा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गदळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ह.भ.प. सुखाहारी (तात्या) गदळे, राहुलभैया गदळे, शरदबाप्पा गदळे, सरपंच अनिताताई गदळे, डॉ. शशिकांत दहिफळकर, जयदत्तभैया दहिफळकर यांच्यासह गदळे परिवार परिश्रम घेत आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.