ताज्या घडामोडी

अल्पवयीन बालिकांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंतेची बाब; केज आणि अंबाजोगाईत पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल, संशयित पोलिसांच्या ताब्यात.

पाठलाग न्यूज / क्राईम प्रतिनिधी :

अल्पवयीन बालिकांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंतेची बाब; केज आणि अंबाजोगाईत पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल, संशयित पोलिसांच्या ताब्यात.

​बीड / केज / अंबाजोगाई: आदर्श समाजामध्ये किडलेल्या कु-प्रवर्ती आणि नीती भ्रष्ट प्रवर्तींचा शिरकाव झाल्याने समाजाचे पावित्र्य संकटात सापडले असून, जिकडे तिकडे अंगावर शहारे आणणारे अनैतिक प्रकार घडत असतानाच, बीड जिल्ह्यात बालकांवरील अत्याचार आणि छळवणुकीच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही अत्यंत धक्कादायक असून, समाजासाठी एक गंभीर इशारा ठरत आहे. याबाबतची चिंताजनक माहिती अशी की, अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे आणि केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोन्ही प्रकरणांत पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलत पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल केले असून, आरोपींना जेरबंद केले आहे. ​: केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात नात्यातीलच दोघांकडून ७ वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची केळस वाणी घटना समोर आली आहे.​ हाअत्यंत निंदनीय प्रकार उघडकीस आल्याने समाजातील नाते-गोती देखील शिल्लक राहिलेले आहेत की नाही याचा प्रश्न समाजासमोर उभा राहिला आहे. इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या ६ वर्षे १० महिने वय असलेल्या चिमुकलीवर नात्यातीलच दोन मित्रांनी आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडलीआहे.पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोक्सो व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​आरोपींची अटक: ‘पिंक पथका’चे पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके यांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केले. यातील एक आरोपी १९ वर्षांचा असून त्याला केज न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर दुसरा आरोपी १५ वर्षांचा असून, पुढील तपास सुरू आहे. ​बालिकेची वैद्यकीय तपासणी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात महिला रोगतज्ज्ञांकडून करण्यात आली आहे. अशाच प्रकारच्या ​ दुसऱ्या घटनेत अंबाजोगाईत दोन वर्षांपासून पाठलाग करून १७ वर्षीय मुलीवर बळजबरी ​अंबाजोगाई शहरातील मोची गल्ली व सदर बाजार परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गेल्या दोन वर्षांपासून पाठलाग करून तिला धमकावल्याचा आणि इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपी ऋतिक देवदत्त चौधरी (रा. अंबाजोगाई) याने जबरदस्तीने मुलीचा मोबाईल नंबर मिळवून तिला सोशल मीडियावर मेसेज केले व धमकावून भेटण्यास बोलावले. भीतीपोटी भेटायला गेलेल्या मुलीवर त्याने बळजबरीने अत्याचार केला. पीडितेने हिंमत दाखवून घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बीएनएस (BNS) कलम ६४(१), १३७(२), ३५१(२) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे करत आहेत.​या दोन्ही घटनांचा गांभीर्याने विचार करता, समाजात आणि कुटुंबात बालकांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे झाले आहे. ‘पाठलाग न्यूज’च्या माध्यमातून नागरिकांना आणि पालकांना खालील गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे: ​१. गुड टच आणि बॅड टचची ओळख: अगदी लहानपणापासूनच मुलांना (मुली व मुलगे दोघांनाही) ‘सुरक्षित स्पर्श’ आणि ‘असुरक्षित स्पर्श’ यातील फरक सोप्या भाषेत समजवून सांगा. २. संवादाचे मोकळे वातावरण: मुलांशी रोजच्या जीवनाबद्दल मोकळा संवाद ठेवा, जेणेकरून त्यांच्यासोबत काही चुकीचे घडत असल्यास ते न घाबरता पालकांना सांगू शकतील. ३. अनोळखी किंवा नात्यातील व्यक्तींवर अंधाधुंद विश्वास नको: अनेक प्रकरणांमध्ये अत्याचार करणारे ओळखीचे किंवा नात्यातीलच असतात, त्यामुळे लहान मुलांना कोणासोबतही एकटे सोडताना काळजी घ्या. ४. डिजिटल सुरक्षितता व पाठलाग: वाढत्या वयातील मुलांच्या मोबाईल वापराकडे आणि सोशल मीडियाच्या देवाणघेवाणीकडे लक्ष ठेवा. कोणी पाठलाग करत असल्यास किंवा धमकावत असल्यास ते लपवून न ठेवता त्वरित पालकांना किंवा पोलिसांना कळवा. ५. ‘पिंक पथक’ आणि ‘११२’ ची मदत घ्या: कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाच्या ११२ या हेल्पलाइन नंबरवर किंवा स्थानिक पोलीस ठाण्याच्या पिंक पथकाशी निसंकोचपणे संपर्क साधा. “अल्पवयीन बालकांवर होणारे अत्याचार हा केवळ कायद्याचा प्रश्न नसून तो सामाजिक नैतिकतेचाही प्रश्न आहे. पीडितांना न्याय मिळवून देणे जेवढे गरजेचे आहे, तितकेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी समाजाने आणि पालकांनी अधिक जागृत होणे काळाची गरज आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये