ताज्या घडामोडी

१६० कोटींचा ‘शालार्थ’ घोटाळा: भाजप नेते संजय गरुडच्या सोलापुरात आवळल्या मुसक्या; बीडचा वादग्रस्त माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकरचा ‘बोगस’ कारनामा उघड!

पाठलाग न्यूज / विशेष प्रतिनिधी:

१६० कोटींचा ‘शालार्थ’ घोटाळा: भाजप नेते संजय गरुडच्या सोलापुरात आवळल्या मुसक्या; बीडचा वादग्रस्त माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकरचा ‘बोगस’ कारनामा उघड!

नाशिक/बीड:
राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या तब्बल १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिक शहराच्या विशेष तपास पथकाने (SIT) अत्यंत धडक व थरारक कारवाई केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेला जळगावचा शिक्षण सम्राट तथा भाजप पदाधिकारी संजय गरुड याला नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून छापा टाकून ताब्यात घेतले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या महाघोटाळ्याची पाळेमुळे थेट बीड जिल्ह्याशी आणि बीडचे तत्कालीन वादग्रस्त माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर याच्याशी थेट जोडली गेली आहेत. हिंगोणीकर याने आपल्या कार्यकाळात बेकायदेशीररीत्या वाटलेल्या बोगस मान्यतेच्या ‘काळ्या धंद्या’चा बुरखा आता एसआयटीच्या तपासात पूर्णपणे फाटला आहे.

​बीडचा तत्कालीन शिक्षणाधिकारी हिंगोणीकर ठरला मुख्य सूत्रधार!
​’पाठलाग न्यूज’ला मिळालेल्या विशेष माहितीनुसार, नाशिक पोलिसांनी यापूर्वी जळगाव जिल्हा परिषदेचा तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर याना गजाआड केले होते. हिंगोणीकर जेव्हा बीड जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत झाले , तेव्हा  त्यांच्या मनमानी आणि संशयास्पद कारभाराची चर्चा शिक्षण वर्तुळात रंगली होती.
​बीड येथे बदली होऊन येण्यापूर्वी हिंगोणीकर यानी जळगावात आपला ‘दुकानदारी’चा मोठा पसारा मांडला होता. तेथे त्यानी पदाचा गैरवापर करत तब्बल २५९ शिक्षकांना नियमबाह्य व बेकायदेशीर मागच्या तारखेच्या (Backdated) मान्यत्या दिल्या. नाशिक एसआयटीने जेव्हा हिंगोणीकरची कसून चौकशी केली, तेव्हा त्यानी ओकलेल्या माहितीने पोलीसही चक्रावून गेले. हिंगोणीकरने दिलेल्या या बहुतांश बोगस मान्यता थेट संजय गरुड याच्या ‘शेंदूर्णी एज्युकेशन सोसायटी’शी निगडित असल्याचे निष्पन्न झाले आहे!
​एकाच दिवसात १७७ बोगस आयडी दिल्याचे स्पष्ट झाले नंतर नाशिक पोलिसांची ‘नातेपुते’त धडक!
​संजय गरुड याच्या संस्थांमधील तब्बल १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी एकाच दिवसात अत्यंत संशयास्पद रीतीने तयार करण्यात आले होते. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता, फक्त शासकीय तिजोरी लुटण्याच्या उद्देशाने हिंगोणीकर आणि गरुड या दुकलीने हा बनाव रचल्याचे तपासात उघड झाले आहे.
​मार्च २०२६ मध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून गरुड मात्र फरार होता. तो सोलापूर जिल्ह्यातील एका गुप्त फार्महाऊसवर लपून बसल्याची गुप्त माहिती मिळताच, नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) संदीप मिटके आणि त्यांच्या पथकाने मोबाईल लोकेशन ट्रेस करत मध्यरात्री छापा टाकला आणि गरुडच्या मुसक्या आवळल्या.
​१६० कोटींचा दरोडा आणि १२-शे संशयित!
​एसआयटीच्या प्राथमिक अंदाजानुसार हा घोटाळा १६० कोटी रुपयांच्या घरात गेला आहे.
​८४१ बोगस पदे: उत्तर महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांमधील २०० हून अधिक शाळांमध्ये बनावट शिक्षक भरती दाखवून शासनाचा पगार लाटला गेला.
​१,२०० जण रडारवर: या घोटाळ्यात तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर, संस्थाचालक संजय गरुड यांच्यासह बोगस शिक्षक, पगार विभागाचे वेतन अधीक्षक आणि मध्यस्थ (एजंट) असे एकूण १२-शे संशयित पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
​राजकीय वरदहस्ताची चौकशी होणार?
​संजय गरुड याने जानेवारी २०२४ मध्येच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मात्र, राजकीय वजनाचा वापर करून बीडचा माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर आणि गरुड यांनी मिळून शासकीय तिजोरीवर मारलेला हा दरोडा आता त्यांच्या अंगलट आला आहे. हिंगोणीकरने बीड आणि जळगावात वाटलेल्या बोगस मान्यतेचे जाळे आणखी कुठे कुठे पसरले आहे? हिंगोणीकर आणि गरुड यांच्या खात्यात जमा झालेला कोट्यवधींचा काळ पैसा कोणाकोणाला पुरवला गेला? एसआयटी आता या महाघोटाळ्याच्या मूळ आकांपर्यंत पोहोचणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर:- ​शशिकांत भाऊराव हिंगोणीकर (वय ६६ वर्ष). ​ हे २०११ हे २०१५ दरम्यान  जळगाव येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते.नाशिक गुन्हे शाखा धुळे येथून त्यांना तांत्रिक तपासाच्या मदतीने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेनंतर त्यांना नाशिक रोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ​अधिकार पदाचा गैरवापर: २०११ ते २०१५ या कालावधीत पदाचा गैरवापर करून बोगस शालार्थ मंजुरी आदेश जारी केल्याचा शशिकांत हिंगोणेकर यांच्यावर प्राथमिक आरोप आहे. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील ८४९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने कोणतीही अधिकृत शासकीय मान्यता नसताना शालार्थ प्रणालीत गैरकायदेशीर नोंदी केल्याचे उघड झाले आहे.​या बनावट शालार्थ आयडी आणि मान्यतेच्या आधारे बोगस शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन आणि थकीत मानधन (Arrears) दिले गेले. ​यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीचे सुमारे १६० कोटी रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांनीबीड येथे बदलून आल्यानंतर देखील मोठ्या वेगाने शिक्षण संस्था चालकांशी संगणमत करून अनेक घोटाळे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बीडच्या शिक्षण विभागातील अनेक प्रकरणात मा.न्यायालयाच्या आदेशाला डावलून मनमानी करत स्वतःचाच कायदा चालवला असल्याचे अनेक प्रकार समोर येणार असल्याचे वर्तवले जात आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये