ताज्या घडामोडी
सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील आंदोलनास केजकरांचा पाठिंबा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध !
Pathlag

सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील आंदोलनास केजकरांचा पाठिंबा. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध !
केज/ प्रतिनिधी: नीट पेपर फूटप्रकरणी अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेस जबाबदार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांचे दिल्ली येथे उपोषण सुरू असताना सरकारने त्यांना जबरदस्ती रुग्णालय दाखल केले. जंतर-मंतर मैदानात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत असताना त्यांच्यावर अमानुष निर्दयपणे लाठीमार करण्यात आला. या हल्ल्याचा निषेध करून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागण्यासाठी मंगळवार मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. भवानी चौक ते तहसील कार्यालय इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणा देत नागरिक मोर्चात सहभागी झाले देण्यात नायब तहसीलदार अशोक भंडारे यांना निवेदन देण्यात आले मोर्चात हनुमंत भोसले, हनुमंत घाडगे, भाई मोहन गुंड ,शिवरुद्र आकुस्कर, रामदास साबळे, प्रवीण सरवदे, गजानन भांगे, शिवाजी पोळ, व्यंकट घोगले, अमोल मस्के वसंत डोईफोडे, मनोज दांगट, शिवाजी ठोंबरे, योगीराज जाधवर ,प्रकाश काळे, हिराचंद काळे ,विलास ओव्हाळ, इकबाल शेख, तात्या गवळी, दया घुंडरे, सदाशिव तांदळे, शारदा गुंड ,राधा सपकाळ, सविता आकुसकर, राधाताई सपकाळ, प्रियंका शिंदे,डॉ हनुमंत सौदागर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



