ताज्या घडामोडी

“शिक्षण खातं तुकाराम मुंडेंकडे सोपवा!” अभिनेते अभिजीत केळकर यांची थेट देवेंद्र फडणवीसांना साद; खासगी शाळांच्या मनमानीवर संताप.

पाठलाग न्यूज / विशेष प्रतिनिधी:

“शिक्षण खातं तुकाराम मुंडेंकडे सोपवा!” अभिनेते अभिजीत केळकर यांची थेट देवेंद्र फडणवीसांना साद; खासगी शाळांच्या मनमानीवर संताप.

​मुंबई: राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. संपूर्ण राज्यात सध्या त्यांच्या या धडाकेबाज कामाची आणि ‘तुकाराम मुंडे पॅटर्न’ची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता शिक्षण क्षेत्रातील वाढता गैरव्यवहार आणि खासगी शाळांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी राज्याचं ‘शिक्षण खाते’ही तुकाराम मुंडे यांच्याकडेच सोपवावे, अशी जाहीर मागणी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते अभिजीत केळकर यांनी केली आहे. ​आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे अभिनेते अभिजीत केळकर यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, अनेकजण यावर सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. ​काय म्हणाले आहेत अभिजीत केळकर? अभिजीत केळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट टॅग करत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की: ​”तुकाराम मुंडे साहेबांचा, कामाचा आणि कारवायांचा धडाका पाहता त्यांच्याकडे तात्काळ शिक्षण खातंही सोपवायला हवं, असं अगदी मनापासून वाटतंय म्हणजे प्रायव्हेट शाळांची मनमानी, मुजोरी, बेफिकिरी, विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही गळचेपी, ह्या सगळ्याला आपोआप चाप बसेल आणि system खऱ्या अर्थाने, “मुळापासून” स्वच्छ व्हायला सुरुवात होईल… Devendra Fadnavis जी, हे करा please 🙏🙏🙏” ​पालकांच्या भावनांना दिली वाट सध्या राज्यात अनेक ठिकाणी खासगी शाळांकडून आकारली जाणारी भरमसाठ फी, डोनेशन आणि पालकांची होणारी अडवणूक हा कळीचा मुद्दा बनला आहे. अभिजीत केळकर यांनी आपल्या पोस्टमधून नेमक्या याच दुखऱ्या नसेवर बोट ठेवले आहे. ‘बिग बॉस मराठी’ तसेच ‘तुझेच मी गीत आहे’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्याने थेट शिक्षण व्यवस्थेच्या मुळाशी असलेली कीड काढण्यासाठी ‘मुंडे पॅटर्न’ची गरज बोलून दाखवल्याने, सर्वसामान्य पालकांकडून या भूमिकेचे मोठे स्वागत होत आहे. ​तुकाराम मुंडेंच्या एफडीए (FDA) मधील कारवाईमुळे सर्वसामान्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता खरोखरच शिक्षण व्यवस्थेतही असाच दबदबा निर्माण करणारा अधिकारी यावा, अशीच अपेक्षा या व्हायरल पोस्टच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये