ताज्या घडामोडी

पत्रकार सय्यद माजेद यांच्यावर शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुख पदाची मोठी जबाबदारी! तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी थेट मैदानात; केज शिवसेना अल्पसंख्याक प्रमुखपदी सय्यद माजेद यांची धडाकेबाज निवड!

पाठलाग न्यूज / प्रतिनिधी:

पत्रकार सय्यद माजेद यांच्यावर शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुख पदाची मोठी जबाबदारी!

तळागाळातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी थेट मैदानात; केज शिवसेना अल्पसंख्याक प्रमुखपदी सय्यद माजेद यांची धडाकेबाज निवड!

​केज (विशेष प्रतिनिधी): आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाने केज तालुक्यात आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करत एक मोठी खेळी खेळली आहे. केज तालुका शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या तालुकाप्रमुख पदाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी “बीड रिपोर्टर” वृत्तसमुहाचे खंदे शिलेदार तथा पत्रकार सय्यद माजेद यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख ॲड. लालाखान पठाण यांनी सय्यद माजेद यांना अधिकृत नियुक्तीपत्र देऊन मैदानात उतरवले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा ‘पाठलाग’ करणाऱ्या माजेद यांच्या या निवडीमुळे केज तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ​हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांच्या ज्वलंत विचारांचा वारसा पुढे नेणारे महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवासेना प्रमुख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद आमदार सईद खान यांच्या विशेष आदेशान्वये ही महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख ॲड. लालाखान पठाण यांनी नुकतेच हे अधिकृत नियुक्तीपत्र सय्यद माजेद यांच्या स्वाधीन केले. ​”पक्षवाढीसाठी आणि जनसेवेसाठी अहोरात्र काम करा” – ॲड. लालाखान पठाण ​नियुक्तीपत्र देताना जिल्हाप्रमुख ॲड. लालाखान पठाण यांनी नवनियुक्त तालुकाप्रमुख सय्यद माजेद यांना विशेष सूचना दिल्या. ते म्हणाले की, ​”सय्यद माजेद यांनी आजवर पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अनेक अन्यायाला वाचा फोडली आहे. आता तोच आक्रमक बाणा ठेवून शिवसेना पक्षाचे विचार तळागळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावेत. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी सदैव पुढाकार घ्यावा.” ​केज तालुक्यात आनंदाचे वातावरण; सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव! ​पत्रकारितेच्या माध्यमातून केज तालुका आणि परिसरातील सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांची खडान् खडा माहिती असणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून सय्यद माजेद यांच्याकडे पाहिले जाते. आता त्यांच्या खांद्यावर अधिकृत राजकीय आणि सामाजिक जबाबदारी आल्याने केज तालुक्यातील अल्पसंख्याक बांधव तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका निष्पक्ष आणि लढवय्या पत्रकाराला ही संधी मिळाल्याने राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले असून, ‘पाठलाग न्यूज’ परिवाराकडूनही त्यांना या नवीन इनिंगसाठी मनापासून शुभेच्छा!

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये