ताज्या घडामोडी

बीडमध्ये खळबळ! विलास घुले हत्या प्रकरणात थेट ‘खासदार पुत्रा’चे नाव; फडणवीसांच्या फोननंतर पोलिसांची मोठी कारवाई!

पाटला न्यूज/ क्राईम रिपोर्टर :

बीडमध्ये खळबळ! विलास घुले हत्या प्रकरणात थेट ‘खासदार पुत्रा’चे नाव; फडणवीसांच्या फोननंतर पोलिसांची मोठी कारवाई!

​बीड/केज: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणाला आता राजकीय आणि अत्यंत संवेदनशील वळण मिळाले असून, थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरब सोनवणे याचे नाव या प्रकरणात समोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आंदोलकांना मध्यरात्री थेट फोन; आंदोलनात मोठी घडामोड!

​गेल्या तीन दिवसांपासून मुख्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी केजच्या टाकळी परिसरात तीव्र रस्ता रोको आंदोलन सुरू होते . काल संतापलेल्या आंदोलकांनी आणि नातेवाईकांनी विलास घुले यांचा मृतदेह तब्बल ९ तास केज पोलीस ठाण्यासमोर ठेवून ठिय्या मांडला होता. आंदोलन तीव्र होत असल्याचे पाहून मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना फोन लावला आणि प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलकांचा रोष काहीसा शांत झाला. ​ घटनेचे मुख्य मुद्दे आणि खळबळजनक घडामोडी:

बीडच्या ​’खासदार पुत्रा’वर गंभीर आरोप: महाराष्ट्राचे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलनाला पाठिंबा देत थेट आरोप केला आहे की, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरब सोनवणे हा विलास घुले यांच्या हत्येमागील टोळीचा मुख्य सूत्रधार सदस्य आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी आंदोलकांनी लावून धरली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ​पोलिसांनी पुरवणी जबाब नोंदवला: मुख्यमंत्र्यांच्या कडक आदेशानंतर केज पोलिसांनी तातडीने हालचाली करत फिर्यादी रमेश घुले यांचा ‘पुरवणी जबाब’ नोंदवून घेतला आहे. या पुरवणी जबाबात सौरब सोनवणे याच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. ​अद्याप गुन्हा नाही, पण चौकशी सुरू:

बीडचे पोलीस अधीक्षक (SP) नवनीत कावत यांनी नातेवाईकांना सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी अद्याप सौरब सोनवणे याच्यावर थेट गुन्हा दाखल केलेला नसला, तरी त्याची कसून चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. ​

सभागृहातही घटनेचे पडसाद: या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार धनंजय मुंडे आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणात लक्ष घातले असून, सभागृहात आणि फोनद्वारे या संदर्भात कडक चौकशीची मागणी उचलून धरली होती. केज विधानसभा परिक्षेत्राच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनीही सभागृहात विलास घुले च्या हत्या प्रकरणाचा प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली होती. खा.​बजरांग सोनवणे यांचे आव्हान: दुसरीकडे, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांसमोर येत बचावात्मक ऐवजी आक्रमक भूमिका घेतली आहे. “माझा मुलगा असला तरी त्याची पूर्ण चौकशी करा, सरकारने हवी तर SIT किंवा CID लावावी, पण दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे,” असे आव्हान त्यांनी प्रशासनाला दिले आहे. ​& तणावानंतर अंत्यसंस्कार:

​मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आणि पोलिसांनी पुरवणी जबाब नोंदवून घेतल्यानंतर नातेवाईकांनी नऊ तासांनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केले आणि त्यानंतर रात्री उशिरा विलास घुले यांच्या पार्थिवावर टाकळी शिवारात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ​आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे की, पोलीस प्रशासनाकडून खासदार पुत्राची चौकशी कधी होणार आणि त्याला या प्रकरणात अटक होणार का? हा प्रश्न समोर आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये