ताज्या घडामोडी

न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांची सक्तीची सेवानिवृत्ती; कामकाज सुरू असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने अंबाजोगाईत कारवाई.

पाठलाग न्यूज / विशेष प्रतिनिधी :

न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांची सक्तीची सेवानिवृत्ती; कामकाज सुरू असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने अंबाजोगाईत कारवाई.

​अंबाजोगाई/विशेष प्रतिनिधी: अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात कार्यरत असलेल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सक्तीच्या सेवानिवृत्तीची धडक कारवाई करण्यात आल्यामुळे न्याय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा की,गुरुवारी (३ सप्टेंबर रोजी अंबाजोगाई सत्र न्यायालयात दैनंदिन सुनावणीचे कामकाज सुरू असतानाच या आदेशाची प्रत्यक्षक ऑन वर्किंग टेबलवर या कार्यवाहीची अंमलबजावणी करण्यात आल्याने न्यायालयीन वर्तुळात प्रचंड आश्चर्य व्यक्त केले जात आहे.३ सप्टेंबर रोजी सकाळी अंबाजोगाई सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी आगामी लोकअदालतीच्या पूर्वतयारीसंदर्भात सर्व न्यायाधीश, भूसंपादन अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर नेहमीप्रमाणे कोर्ट रूममध्ये दैनंदिन बोर्डावरील खटल्यांची नियमित सुनावणी प्रक्रिया सुरू झाली. ​सुनावणीचे कामकाज सुरू असतानाच, बीडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अंबाजोगाई न्यायालयात उपस्थित राहून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली आणि त्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आल्याचे प्रशासकीय पत्र सुपूर्द केले. ​न्यायालयीन प्रशासनात सक्तीची सेवानिवृत्ती ही उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय व शिस्तभंग समितीच्या स्तरावर घेतली जाणारी अत्यंत गंभीर व गोपनीय प्रक्रिया मानली जाते. त्यामुळे ही कारवाई नेमक्या कोणत्या कारणास्तव किंवा कोणत्या खटल्याच्या अनुषंगाने करण्यात आली, याचा अधिकृत तपशील उच्च न्यायालय अथवा जिल्हा प्रशासनाकडून सार्वजनिक करण्यात आलेला नाही. प्रत्यक्ष कामकाज सुरू असतानाच झालेल्या या अचानक कारवाईमुळे विधीज्ञ आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये न्यायव्यवस्था किती सतर्क असू शकते आणि किती सतर्क झाली आहे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये