भाजपाला उशिरा सुचलेलेशहाणपण!!—————-पंकजाताईंच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला लागणार हातभार.—————————————- बीड:विधान परिषदेत विधान परिषदेच्या आमदार म्हणून बीड जिल्ह्याच्या माजीमंत्री आ. पंकजाताई मुंडे यांची वर्णी लागल्याने त्यांच्या आमदारकीचा फायदा जिल्ह्याच्या विकासासाठी होणार आहे.जिल्ह्यात पूर्वीचे सात आमदार व दोन खासदार आणि पंकजाताईंच्या माध्यमातून आठवा आमदार बीड जिल्ह्याला लाभला आहे. येणाऱ्या पंधरा दिवसात पंकजाताईंना राज्याचे मंत्रिपद मिळेल असा विश्वास मुंडे समर्थकांना वाटतो आहे. तर भारतीय जनता पक्षाने पंकजाताईंना दिलेली विधान परिषदेचे आमदारकी हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाला आता दहा लोकप्रतिनिधी मिळाले आहेत. बीड जिल्ह्याच्या विकासाला आता दहा लोकप्रतिनिधी लाभले आहेत.जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचे सहा आमदार,राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील, बीड लोकसभेचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे,विधान परिषदेचे आ. सुरेश धस व आता पंकजाताईंना विधान परिषदेवर पाठवले आहे. पंकजाताई मुंडे हे जनसामान्यांचे नेतृत्व आहे. ओबीसी नेत्या म्हणून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाय लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या त्या कन्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप महायुतीचा दारुण पराभव झाला.45 पेक्षा अधिकचा नारा देणाऱ्या भाजपाला नऊ पेक्षा पुढे जाता आलं नाही तर महायुती म्हणून केवळ 17 जागा जिंकल्या. राज्यातील राजकीय परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सत्ताधाऱ्यांबद्दल प्रचंड संताप व रोष आहे.नव्या महायुतीवर सामान्य मतदार नाराज आहे. भाजपचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक असे त्यांचे धोरण आहे.म्हणून त्याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत बसला तसेच ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनाच सोबत घेऊन ‘ क्लीन अँड क्लिअर ‘ केल्यामुळे सामान्य माणसाला ही बाब रुचलेली नाही.मराठा समाजात सत्ताधाऱ्यांबद्दल प्रचंड असंतोष आहे. त्याचाही फटका मोठ्या प्रमाणात बसला.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाज, मुस्लिम समाज व बौद्ध समाज एकवटला आणि त्याचे रूपांतर प्रत्यक्ष मतदानात झाले.आता भाजपकडे ओबीसी शिवाय व्होट बँक नाही.गेली पाच वर्ष पंकजाताईंना पदापासून व सत्तेपासून दूर ठेवण्याचे पाप भाजप व देवेंद्र फडणवीस यांनी केले.लोकसभेत भाजप बॅकफुटवर गेल्याने आता विधानसभेला तरी मोठा फटका बसू नये म्हणून पंकजाताईंना विधान परिषदेवर घेण्यात आले आहे.त्यांना ही विधानपरिषद सहजासहजी दिलेली नाही. भाजपाची नौका डुबत असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘ मासलीडर ‘ असलेल्या पंकजाताईंना सन्मान देण्यात आला आहे.जुनी भाजपा आजही अडगळीला पडली आहे. जुन्या भाजपातील माधव भंडारी, केशव उपाध्ये व इतर प्रवक्ते मंडळी आज कुठे आहे? याचा शोध घ्यावा.आता भाजपाने सुसंस्कृत प्रवक्ते ठेवले नाहीत तर संस्कृती सोडून अंगावर जाणारे प्रवक्ते ठेवले आहेत.राणे असोत,दरेकर असोत, राम कदम असोत की पडळकर इतर कोणी असो? हे भाजपात कधी आले त्यांचे पुनर्वसन किती लवकर झाले? हे पाहिले तर पंकजाताईंना खूप उशिरा न्याय मिळाला आहे. पंकजाताईंना सन्मान मिळाला ही अभिनंदन बाब आहे.पण भाजप अडचणीत असल्याने त्यांना वरील परिषदेवर घेण्यात आले.ज्यांनी भाजपच्या तोंडात भरपूर शेण घातलेले आहे ‘हाफ चड्डीपर्यंतची ‘ त्यांची भाषा राहिलेली आहे.असे दल बदलू व प्रासंगिक करार ठेवणारे नेते भाजपसोबत राहिल्यास भाजपाचे पतन व्हायला वेळ लागणार नाही हेही तेवढेच खरे. पंकजाताईंच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला विकासाची ही नवी संधी निर्माण झाली आहे. पंकजाताई सारखे अष्टपैलू नेतृत्व हे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सक्षम असे नेतृत्व आहे.त्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासात त्यांचा हातभार लागणार आहे.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.