ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पालकमंत्र्यांना जातीयवाद, दबावतंत्राचे पाप विधानसभेत फेडावे लागेल; खा.बजरंग सोनवणे कडाडले. अंबाजोगाईकरांनी केला नागरी सत्कार, सत्काराला लोटला जनसमुदाय.

पाठलाग न्युज/प्रतिनिधि:

पालकमंत्र्यांना जातीयवाद, दबावतंत्राचे पाप विधानसभेत फेडावे लागेल; खा.बजरंग सोनवणे कडाडले.

अंबाजोगाईकरांनी केला नागरी सत्कार, सत्काराला लोटला जनसमुदाय.

अंबाजोगाई: लोकसभा निवडणूकीत पालकमंत्र्यांनी सत्तेचा वापर करत दबावतंत्राचा वापर केला. शेतकऱ्याचं पोरगं खासदार होऊच नये, यासाठी जीवाचे रान करताना जातीयवाद करण्याचे पाप केले. हे पाप त्यांना विधानसभा निवडणूकीत फेडावेच लागेल, अशा शब्दात खा.बजरंग सोनवणे कडाडले. मुकूंदराज सभागृहात अंबाजोगाईकरांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मिरपरकुंद अलिी उस्मानी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमूख, मा.आ.पृथ्वीराज साठे, डॉ.नरेंद्र काळे, बबन शिंदे, उध्दव बापू अपेगावकर, भाई थावरे, कालीदास अपेट, अमर देशमूख यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.सोनवणे म्हणाले,सत्ता पक्षांचे नेते, धनशक्ती आणि सत्तेचा पुरेपूर वापर करत आहेत. दबाव तंत्राचा वापर करून देखील जनतेने सत्तांध शक्तीचा पराभव करून सर्व सामान्य शेतकऱ्याच्या पोराला खासदार केले आहे. मी खासदार होऊच नये म्हणून जीवाचे रान आणि आकाश पाताळ एक करताना पालकमंत्र्यांनी जातीयवाद आणि दबावतंत्राचा वापर करण्याचे पाप केले. परंतु आता विधानसभेत हेच पाप फेडावे लागेल. जिल्ह्यातील सहाही मतदार संघात तुतारीचा निनाद होणार असून आपण मला खासदार केले. येणाऱ्या काळात आपल्याला जिल्ह्याचे राहिलेले कामे करून कशी घ्यायची, ते मी बघतो. माझ्या सहित जिल्ह्यातील सर्व जनतेला ज्यांनी त्रास दिला, त्याचा हिशोब विधानसभेला होणार आहे. जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम बंद करा, मनोज जरांगे पाटील आणि मला शिव्या देणाऱ्यांना पाठीशी कोण घालतंय?, त्यांना आवर घाला, असा इशाराही खासदारांनी अप्रत्यक्ष पालकमंत्र्याना दिला. (खा.बजरंग सोनवणे--‘ …तर माझ्या कारखान्याला ऊस का दिला? बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्याचे काम मला करायचं आहे. ऊसाचा काटा मारून कारखाना चालवणारी अवलाद माझी नाही. मी कटा मारून कारखाना चालवत असेल तर याच पालकमंत्र्यांनी ३ वर्ष ऊस माझ्या कारखान्याला दिला कसा? असा खोचक सवाल खा.बजनरंग सोनवणे यांनी केला.) ००० कोण काय म्हणाले… मा.आ.साठे:आजची तारीख ही तेरा सात आहे. आपण अंबाजोगाईकरांची साथ कधीही सोडू नये, म्हणून आजची तारीख निवडली आहे. खासदार सोनवणेंच्या हाताने गोर गरीबांचे कामे होतील, असा विश्वास आहे. कालिदास आपेट:आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त भाव खासदारांच्याच कारखान्याने दिला आहे. हार्वेस्टर व ऊसतोड मजूर यांना तोडणीचा भाव सारखाच मिळावा, याची मागणी सभागृहात करावी अशी करत आहे. राजेसाहेब देशमुख:देश्यामध्ये व महाराष्ट्रमध्ये राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी प्रचंड मेहनत घेतली. आपण सर्वांनी लोकसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन केले. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्येही परिवर्तन करायचे आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये