संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;
केज /प्रतिनिधी: भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संविधान एकता युवा मंच, केज यांच्या वतीने निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये डॉ. आंबेडकर यांचे कार्य, विचार व देशासाठीचे योगदान याबद्दल जागृती व्हावी, या उद्देशाने या स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावीपणे उभे केले, तर चित्रकला स्पर्धेतून त्यांच्या जीवनकार्याचे सुंदर चित्रण साकारण्यात आले. या स्पर्धांमध्ये केज शहरातील वसंत माध्यमिक विद्यालय, जय भवानी कन्या प्रशाला तसेच वसंत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटांत घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव दि. १४ एप्रिल रोजी संविधान एकता युवा मंच आयोजित भिम जन्मोत्सव कार्यक्रमात करण्यात येणार असून त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.