राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम.
बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब आज शुक्रवार दि. 9 मे 2025 रोजी बीड जिल्हयाच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.सकाळी 11.15 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून हेलीकॉप्टरने बीडकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता आदिनाथ शास्त्री महाराज तारकेश्वरगड येथील हेलीपॅड वर आगमन व मोटारीने तारेश्वरकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता तारकेश्वरगडाचे संस्थापक श्री नारायण महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त उत्सवास उपस्थिती, स्थळ तारकेश्वरगड, जि. बीड.दुपारी 12.45 वाजता आदिनाथ शास्त्री महाराज तारकेश्वरगड येथील हेलीपॅडकडे प्रयाण व दुपारी 1.00 वाजता हेलीकॉप्टरव्दारे पुणेकडे प्रयाण”.
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.