ताज्या घडामोडी

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन.मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार.

पाठलाग प्रतिनिधी :

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन.मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार.

केज/प्रतिनिधी:उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना केज तालुका ग्राम सखींच्या वतीने केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कार्यालयास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात पुढील पंधरा दिवस किंवा शासन निर्णय वेळेपर्यंत ऑनलाईन काम बंद करत केल्या असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देण्यास पन्नास हून अधिक ग्राम सखींची उपस्थिती होती यावेळी निवेदनावर स्वाक्षरी करून तात्काळ मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे ग्रामसखींना अपंगत्व मृत्युमुखी दहा लाख विमा सानुग्रह अनुदान त्वरित मंजूर करावे, ऑनलाइन कामासाठी चांगले टॅब व अतिरिक्त मानधन मासिक 20 रुपये त्रीमासिक 50 रुपये द्यावे. वाढीव मानधन एप्रिल जुलै 2026 चे मानधन तात्काळ अदा करावे. उमेद कक्षा ग्रामविकास विभागाचा कायमस्वरूपी दर्जा द्यावा मासिक मानधन वाढ 15000/ प्रभाग संघ केडर 24000 द्यावे.  मासिक ग्रेडेशन प्रवास भत्ता व अतिरिक्त कामाचे मानधन द्यावे. विनंती बदल्या: IJP शिक्षण शुल्कः प्रवास/दैनिकभत्ता वाढ FTA : PFGratuity, Mediclaim 10% वेतन वाढ एक महिन्यात लागू करावा. C SC कर्मचाऱ्याचे उमेद समायोजन व समान काम तसेच समान वेतन लागू करावा. मानधन ग्राम सखीं च्या खात्यात थेट वर्ग करावे.वाढीव मानधन ,दरमहा वैयक्तिक खात्यावर वर्ग करण्यात यावे आदि मागण्याबाबत शासनाकडून लेखी आदेश मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील त्यासाठी सर्व ग्राम सखी काम बंद ठेवून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत राहतील असे निवेदनातून मागणी करण्यात आलेली आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये