Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक भरती महाघोटाळा:शिक्षण अधिकाऱ्याचा शासकीय तिजोरीवर दरोडा!! मा.शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना अटक; SIT च्या जाळ्यात शिक्षण खात्यातले २६ ‘व्हाईट कॉलर’ आरोपींचासमावेश.

पाठलाग न्यूज / क्राइम प्रतिनिधी :

शिक्षक भरती महाघोटाळा:शिक्षण अधिकाऱ्याचा शासकीय तिजोरीवर दरोडा!!

मा.शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना अटक; SIT च्या जाळ्यात शिक्षण खात्यातले २६ ‘व्हाईट कॉलर’ आरोपींचासमावेश.

​ क्राईम प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रात खळबळ माजवणारा कोट्यवधी रुपयांचा शिक्षक भरती आणि पगार वितरणचा गैरव्यवहार आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून,नागपूर जिल्हा परिषदेतील मा. शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना विशेष तपासणी पथकाने (SIT) अटक केली आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात ‘शालार्थ’ ऑनलाइन वेतन प्रणालीचा गैरवापर करून सरकारी तिजोरीवर सुमारे १२ कोटी रुपयांचा दरोडा टाकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत समोर आलेली सविस्तर माहिती अशी की, नागपूरमध्ये विभागात झालेल्या या महाघोटाळ्यामुळे राज्यातील शिक्षण विभागात सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी मराठवाड्यातील बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्येही शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून बनावट शिक्षक भरती आणि वेतन काढल्याचे मोठे घोटाळे उघडकीस आले होते, ज्यामुळे शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची ही साखळी किती व्यापक आहे, हे स्पष्ट होते.                                  १२ कोटींचा घोटाळा:
‘शालार्थ’ प्रणालीचा गैरवापर ​नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या तक्रारीवरून हा घोटाळा उघडकीस आला. तपासात असे दिसून आले आहे की, आरोपींनी संगनमत करून ‘शालार्थ’ प्रणालीमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला.                                                   ​बनावट आयडी निर्मिती: अस्तित्वात नसलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करण्यात आले. ​फसवणूक: या बनावट आयडींच्या नावावर वेतन काढून १२ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली. ​२०२१ ते २०२२ या कालावधीत शिक्षणाधिकारी असताना रवींद्र काटोलकर यांनी बनावट ओळखपत्रांची माहिती असूनही कोणतीही शहानिशा न करता पगाराचे प्रस्ताव मंजूर केले. त्यांच्या या ‘दुर्लक्षामुळे’ किंवा ‘सहभागामुळे’ शासनाचे मोठे नुकसान झाले.                                           SIT च्या जाळ्यात मोठे मासे: २६ आरोपींना बेड्या!                                           ​हा घोटाळा केवळ शिक्षणाधिकाऱ्यांपुरता मर्यादित नाही, तर यामध्ये शिक्षण विभागातील अनेक उच्च आणि मध्यम स्तरावरील अधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन गुंतलेले आहे. या प्रकरणी एसआयटीने आतापर्यंत एकूण २६ जणांना अटक केली आहे, ज्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे हे स्पष्ट होते. ​अटक करण्यात आलेल्या प्रमुख आरोपींमध्ये यांचा समावेश: ​शिक्षण उपसंचालक (माजी) ​शिक्षणाधिकारी (माजी) ​विभागातील अनेक लिपिक आणि कार्यालयीन कर्मचारी ​विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शाळा संचालक ​या सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयाने दोषारोपपत्र दाखल केले आहे. शिक्षण विभागातील अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याने संपूर्ण यंत्रणा हादरली आहे.                                                              आरोपी शिक्षणाधिकारी ​काटोलकर यांना २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. ​अटक करण्यात आलेले रवींद्र शंकरराव काटोलकर यांना मंगळवारी दि.२३ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात काटोलकर यांच्याकडून घोटाळ्यातील आणखी आर्थिक व्यवहार, फसवणुकीत सहभागी असलेले ईतर आणि चोरीला गेलेला पैसा कुठे वळवण्यात आला, याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तपासातून आणखी किती बडे अधिकारी उघडकीस येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

शिवदास मुंडे.

हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये