Breaking Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
विधानसभा सदस्य प्रशांत बंब यांची शासनाकडे लक्षवेधी!!! बीड जिल्हा ऊसतोड कामगार मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालयाच्या उद्धव कराडच्या बनावट कारस्थानाचे’पोलखोल’!!
पाठलाग न्युज /प्रतिनिधी :

बीड जिल्हा ऊसतोड कामगार मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालयाच्या उद्धव कराडच्या बनावट कारस्थानाचे’पोलखोल’!!
विधानसभा सदस्य प्रशांत बंब यांची शासनाकडे लक्षवेधी!!! 
बीड: बीड जिल्ह्यातील केज येथील ऊसतोड कामगार मंडळ संचलित उद्धव कराड याच्या ‘साने गुरुजी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मोठे घोटाळे सरकारच्या दरबारात गाजत आहेत. लाचखोरी, फसवणूक, कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि शासनाचे बनावट जीआर तयार करून बोगस कर्मचारी भरती, तसेच शाळा व वर्गवाढीस मान्यता मिळाल्याचे दाखवल्याचे यासारखे अनेक गंभीर आरोप संस्थाचालक उद्धव कराड याच्यावर आहेत. कराडच्या साने गुरुजी शाळेत महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण मंत्रालयाच्या बनावट सही-शिक्क्यांचा वापर करून तयार केलेल्या शासन निर्णयांच्या आधारे बनावट वर्ग मान्यता आणि बोगस विद्यार्थी रेकॉर्ड दाखवून कर्मचारी भरती केल्याचा मोठ्या आरोपाचा पर्दाफाश आमदार प्रशांत बंब यांनी शासनाकडे केलेल्या तक्रार पत्रातून केला आहे. या गंभीर आरोपानंतर तक्रार पत्रात नमूद केलेलले संपूर्ण दस्ताऐवज तातडीने खुलाशासह शासनाला सादर करण्याचे आदेश बीडच्या समाज कल्याण सहाय्यक संचालकांना देण्यात आले असून, शिक्षण क्षेत्रातील या मोठ्या ‘पोल-खोल’मुळे पुन्हा एकदा बीडच्या गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजली आहे. आमदार प्रशांत बंब यांनी ही ‘लक्षवेधी’ शासनाकडे करून बीड जिल्हा ऊसतोड कामगार मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालयाच्या बनावट कारस्थानाचा भांडाफोड केला आहे.




