“महायुती”च्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या पराभवासाठी “सुप्तशक्ती” सरसावल्या!!
बीड: बीड लोकसभेची निवडणूक महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना एकतर्फी ,एकमार्गी व एकसुत्री राहीलेली नसून, निवडणूक प्रक्रियेत मुंडेंच्या पराभवासाठी जानिवपुर्वक सुप्त व गुप्त प्रवृत्तींचा शिरकाव झाल्याने पंकजाताईंचा विजयाचा मार्ग विचलित होत असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.
महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचारासाठी ठोस मुद्दे नसले तरी,जाणीवपुर्वक छिछूरे चाळे करुन गैरप्रचार दाखवून मतदारांची दिशाभूल करणे,रेल्वे आणणे, विमानतळ उभारणे,महामार्ग तयार करणे,शेतकऱ्यांचे भले करणे,तसेच मराठा आंदोलन व मराठा आरक्षणाची चादर अंगावर घेऊन मतदारांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न जिल्ह्यात प्राकर्षाने समोर आनले जात आहेत. विशिष्ट समाजातील नेत्यांकडून “संवाद ” मेळाव्यांच्या नावाखाली आपल्या व्हेग वक्तृत्वाच्या अमलाने हिप्टाॅइज करुन महायुतीच्या उमेदवाराला शक्तीहिन करण्याचा मोठा प्रयत्न जिल्ह्यातील कही सुप्त प्रवृतीकडून केला जात असल्याचे चित्र दिसत आहे. ही परिस्थिती असली तरी,महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात बीड लोकसभेच्या ” कुरुक्षेत्रावर” असलेला उमेदवार हा सर्व सामान्य जनता,शेतकरी व मतदारांना आपल्या अतिमत्वकांक्षी स्वभावाच्या बळावर सर्वानाच “चंदन लावणारा” असल्याची कल्पना असल्याची जाणीव असल्याने जिल्ह्यातील तमाम जनता चालू असलेल्या व्हेग प्रचाराला व दिशाभूल करणाऱ्याला बळी पडणार नाही हे निश्चित!!!
हे पोर्टल मालक, प्रकाशक शिवदास मारोती मुंडे यांनी पाठलाग कार्यालय,"शिवशक्ती " पाण्याच्या टाकी जवळ, महात्मा फुलेनगर, केज जि.बीड(महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले.(पोर्टल मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या संदर्भात संपादक, मालक सहमत असतीलच असे नाही. **कुठलाही वाद-विवाद केज न्यायालयाच्या कक्षेत.